कोरोना  : उस्मानाबाद जिल्ह्यात १७ फेब्रुवारी १७ रुग्णाची भर

जिल्ह्यात  ऍक्टिव्ह रुग्णाची संख्या १५५
 

उस्मानाबाद - उस्मानाबाद जिल्ह्यात आज गुरुवार दि.१६ फेब्रुवारी रोजी १७ नव्या  कोरोना रुग्णाची भर पडली तर ५९ रुग्ण बरे होवून घरी परतले. त्यामुळे  जिल्हयात  ऍक्टिव्ह रुग्णाची संख्या १५५  झाली आहे. 

आज  पॉजिटीव्ह आलेल्या रुग्णामध्ये  उस्मानाबाद ६,  तुळजापूर १, उमरगा २, लोहारा ३, कळंब २ , वाशी ०, भूम २, परंडा १ असा समावेश आहे . 

उस्मानाबाद जिल्ह्यात आतापर्यंत ७४ हजार १० रुग्ण आढळले असून , पैकी ७१ हजार ७५२ रुग्ण बरे झाले आहेत. तसेच आतापर्यं २०८६ रुग्णाचा मृत्यू झाला आहे.