उस्मानाबाद सौर उर्जा प्रकल्पाचे काम जुलैपर्यंत पुर्ण करा

- केंद्रीय राज्यमंत्री डॉ.भारती पवार
 

     उस्मानाबाद -   वीजेचा वाढता वापर  आणि वीज उपकेंद्रांवरील तणावामुळे वीज पुरवठा वारंवार खंडीत होत असतो तसेच वीजेचे वाढते दर यास पर्याय म्हणून आपण सौर ऊर्जेचा पर्याय निवडला आहे.यासाठी उस्मानाबाद जिल्हयात कौडगाव येथे  50 मेगावॉट वीजनिर्मिती प्रकल्प उभारण्यात आला आहे.काही कारणास्तव हे प्रकल्प कार्यान्वित होण्यास खुप उशीर झाला असून येणाऱ्या जुलैपर्यंत प्रकल्पाची सर्व कामे पूर्ण करून वीज पुरवठा सुरळीत करावा.अशा सूचना केंद्रीय आरोग्य व कुटुंब कल्याण राज्यमंत्री डॉ.भारती पवार यांनी केल्या 

 येथील कौडगाव एमआयडीसी परीसरात सौर ऊर्जा प्रकल्पास त्यानी भेट दिली. यावेळी त्या बोलत होत्या यावेळी त्यांच्या समवेत माजी राज्यमंत्री राणा जगजितसिंह पाटील,BHEL आणि महाजन.को या सौर ऊर्जा प्रकल्प निर्मितीचे पदाधिकारी आणि अभियंता उपस्थित होते.

            हा प्रकल्प 295 एकरमध्ये उभारण्यात आला आहे. जुलै 2019 ला या प्रकल्पास मान्यता मिळाली होती.या प्रकल्पाव्दारे 50 मेगावॉट वीज तयार केली जाणार हे काम पूर्णत्वास आले आहे.सध्या 20 मेगावॉट निर्मिती विजेची सुरू झाली आहे.तसेच उर्वरीत 30 मेगावॉट वीज निर्मितीसाठी जुलैपर्यंतची वेळ डॉ. भारती यांनी दिली आहे.या प्रकल्पात 5-5 मेगावॉटचे 10 युनिटपैकी सध्या 4 युनिट सध्या पुर्ण क्षमतेने कार्यरत आहेत.उर्वरीत 6 युनिटचे काम शेवटच्या टप्यात असून तेही लवकरच पुर्णत्वास येतील असे आश्वासन BHEL चे पदाधिकारी यांनी केंद्रीय राज्यमंत्री भारती यांना दिले.

            औषणीक वीजनिर्मिती ऐवजी सौर ऊर्जा प्रकल्पातून वीज निर्मिती केल्यास कोळशापासून होणाऱ्या प्रदूशन कमी करण्यास मदत होईल.जनतेला स्वस्त आणि स्वच्छ ऊर्जा लवकरात लवकर मिळावी यासाठी प्रकल्पाच्या पदाधिकारी आणि अभियंतानी पुर्ण क्षमतेने काम करावे असेही डॉ.भारती म्हणाल्या