मुख्यालयी न राहणाऱ्या अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना आयुक्त तुकाराम मुंढे  यांचा दणका

 

उस्मानाबाद -आरोग्य विभागात काम करणारे अनेक अधिकारी आणि कर्मचारी मुख्यालयी न राहता इतरत्र राहत असल्याचे निदर्शनास आल्यामुळे आरोग्य विभागाचे आयुक्त तुकाराम  मुंढे यांनी एक परिपत्रक काढून मुख्यालयी राहण्याचा आदेश दिला आहे.

तथापि, अधिकारी आणि कर्मचारी मुख्यालयी राहत नसल्याचे आढळून आल्यास शिस्तभंगाची कारवाई करण्याचा इशारा तुकाराम  मुंढे यांनी दिला आहे.

उस्मानाबाद जिल्ह्यातील आरोग्य विभागात काम करणारे अनेक वरिष्ठ अधिकारी आणि कर्मचारी मुख्यलयी न राहता, अन्य  ठिकाणी राहून घरभाडे भत्ता उचलत  देखील निदर्शनास आले आहे. अशा कर्मचाऱ्यावर कडक कारवाई करण्याचे निर्देश देखील आयुक्त  मुंढे यांनी दिले आहेत.