रस्त्याच्या कामामुळे भूम ते पार्डी वाहतुक मार्गात बदल

 

उस्मानाबाद -  भूम ते पार्डी या रस्त्याच्या घाटभागामधील काँक्रीट रस्त्याचे काम सुरू असल्यामुळे वाहतुकीस अडथळा निर्माण होणार होऊ शकते तसेच  काम पूर्ण होण्यास 30 दिवसाच्या कालावधीची आवश्यकता असल्याने जिल्हाधिकारी कौस्तुभ दिवेगावकर यांनी याबाबत आज अधिसुचनेचना जरी केली आहे .आज पासून 30 दिवसांकरीता जडवाहतुकीसाठी भूम-वाकवड-कुंथलगिरी-सरमडी फाटा हा मार्ग  तर हलक्या वाहतुकीसाठी हिवरा-नांदगाव-तेरखेडा हा मार्ग वाहतुकीसाठी वळण रस्ता म्हणून वापरण्यात येणार आहे.   

येथील सार्वजनिक बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता  यांनी वाहतुकमार्ग लोकांच्या निदर्शनास आणून देण्यासाठी दिशादर्शक फलक, वाहतुक संकेत चिन्हे लोकांना समजेल अशा लावण्याची किंवा उभारण्याची कार्यवाही करावी, असेही  निर्देश जिल्हाधिकारी दिवेगावकर यांनी दिले आहेत.