उस्मानाबादच्या पोलीस अधीक्षकपदी अतुल कुलकर्णी 

 

उस्मानाबाद -  उस्मानाबादच्या पोलीस अधीक्षकपदी अतुल कुलकर्णी यांची नियुक्ती करण्यात आली आहे. कुलकर्णी सध्या चंद्रपूरला अपर पोलीस अधीक्षक आहेत. ते लवकरच आपला पदभार घेतील. 

उस्मानाबादच्या पोलीस अधीक्षक नीवा जैन यांची २० एप्रिल रोजी नागपूरला बदली झाल्यानंतर त्यांच्या  जागी नागपूरचे अक्षय शिंदे यांची नियुक्ती करण्यात आली होती. पण शिंदे यांना उस्मानाबाद पसंद नव्हते आणि ते उस्मानाबादला जॉईंनच झाले नाहीत. 

दरम्यान, नीवा जैन यांना नागपूरला रिलीव्ह करण्यात आले आणि उस्मानाबादच्या पोलीस अधीक्षकपदाचा प्रभारी पदभार अपर पोलीस अधीक्षक नवनीत काँवत यांच्याकडे देण्यात आला होता. अखेर उस्मानाबादच्या रिक्त पोलीस अधीक्षकपदी चंद्रपूरचे अपर पोलीस अधीक्षक अतुल कुलकर्णी यांची नियुक्ती करण्यात आली आहे, तर अक्षय शिंदे एका राजकीय पुढाऱ्यांच्या वरदहस्तामुळे हव्या असलेल्या जालना येथे नियुक्ती मिळाली आहे. 

आठ पोलिसांच्या नियुक्तीचा घोळ  कायम 

माजी पोलीस अधीक्षक नीवा जैन यांनी  जाता - जाता स्थानिक गुन्हे शाखेत आठ पोलिसांच्या  नियमबाह्य पद्धतीने नियुक्त्या केल्या होत्या. त्याची चौकशी विशेष पोलीस महानिरीक्षक प्रसन्ना यांनी केली, पण पुढे काहीच कारवाई केली नाही. अर्थपूर्णरित्या झालेल्या या बदल्याला आता कायदेशीर मान्यता मिळाली की , अशी दबक्या आवाजात चर्चा सुरु आहे.