अरविंद घोडके हा आमचा पदाधिकारी नाही - रघुनाथदादा पाटील
अणदूर - तुळजापूर तालुक्यातील अणदूर येथील शेतकरी संघटनेचा स्वयंघोषित पदाधिकारी सुरुवातीला राजू शेट्टी आणि नंतर रघुनाथदादा पाटील यांच्या संघटनेचा जिल्हा उपाध्यक्ष म्हणून सांगत होता. मात्र राजू शेट्टी आणि रघुनाथदादा पाटील यांनी साफ शब्दात नकार देत तो आमचा पदाधिकारी नसल्याचे सांगितले.
रघुनाथदादा पाटील म्हणाले, घोडके हा आमचा पदाधिकारी असल्याचे सांगत असला तरी आमच्या संघटनेशी त्याचा कसलाही संबंध नाही. आम्हाला कधी तो विचारत नाही, तो मनमानेल तसे आंदोलन करतो, त्याच्या अनेक तक्रारी आहेत.
घोडकेमुळे अणदूर ते जळकोट नॅशनल हायवेचे काम सात वर्षे रखडले
अणदूर - नळदुर्ग भागात शेतकरी संघटनेच्या नावावर दुकानदारी करणारा स्वयंघोषित पदाधिकारी अरविंद घोडके याने शेतकऱ्यांना खोटी आमिषे दाखवून आणि दिशाभूल करून अनेकांची फसवणूक केली आहे. मी तुमचा प्रश्न निकाली लावतो म्हणून प्रकरण हाती घ्यायचे , नंतर साखर कारखानदाराविरुद्ध मोर्चा काढून उपोषण करायचे आणि नंतर आर्थिक तडजोड करून माघार घ्यायची असा धंदा अरविंद घोडके याने सुरु केला आहे.
अरविंद घोडके याने आतापर्यंत ५० ते ६० वेळा उपोषण केले, यामुळे प्रश्न सुटण्याऐवजी चिघळले असून, मोर्चा , उपोषण हा अरविंद घोडके याचा बिझनेस झाला आहे.
याच घोडकेमुळे अणदूर ते जळकोट नॅशनल हायवेचे काम सात वर्षे रखडले आहे .अरविंद घोडके याने केलेल्या सततच्या आंदोलनमुळे या नॅशनल हायवेचे काम रखडले आहे, यामुळे रास्ता अपघात घडून अनेकांचे जीव गेले आहेत, त्याला सर्वश्री जबाबदार हा घोडके आहे, असे लोकांचे म्हणणे आहे.
कंत्रादारास पैश्याची मागणी करण्याची आणि त्याने नकार दिला की आंदोलन करायचे हा घोडके याचा पेशा झाला आहे. याच कारणामुळे घोडके यास आष्टामोडच्या पुढे शेतकरी येऊ देत नाहीत. घोडके याची अनेक प्रकरणे सध्या चर्चेली जात आहेत.
स्वतःच्या समाज बांधवाला एका प्लॉटची बोगस रजिस्ट्री करून देऊन फसवणूक करणाऱ्यांनी दुसऱ्याला शहाणपण शिकवू नये, असे लोकांचे म्हणणे आहे.