उस्मानाबाद जिल्ह्यात २४ रोजी ८० कोरोना पॉजिटीव्ह, १ मृत्यू 

 

उस्मानाबाद - उस्मानाबाद जिल्ह्यात कोरोना रुग्णाची संख्या दिवसेंदिवस कमी होत आहे.  जिल्ह्यात आज २४ जून ( गुरुवार) रोजी ८०  जण कोरोना पॉजिटीव्ह रुग्णाची भर पडली आहे तर १०२ रुग्ण बरे होऊन घरी परतले. तसेच दिवसभरात एका रुग्णाचा मृत्यू झाला. 


उस्मानाबाद जिल्ह्यात आतापर्यंत ५८  हजार ४९ रुग्णाची नोंद झाली असून, पैकी ५५ हजार ८३४  रुग्ण बरे झाले आहेत. आतापर्यंत १३७० रुग्णाचा मृत्यू झाला आहे. जिल्ह्यात ऍक्टिव्ह रुग्णाची संख्या ८४५ झाली आहे.