उस्मानाबाद जिल्ह्यात १५ सप्टेंबर रोजी ७४  कोरोना पॉजिटीव्ह

 ऍक्टिव्ह रुग्णाची संख्या ५३०
 

उस्मानाबाद - जिल्ह्यात आज १५ सप्टेंबर ( बुधवार ) रोजी ७४ कोरोना पॉजिटीव्ह रुग्णाची भर पडली आहे तर २७ रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत. 


उस्मानाबाद जिल्ह्यात आतापर्यंत ६६ हजार ३८३ रुग्णाची नोंद झाली असून, पैकी ६३ हजार ८३४ रुग्ण बरे झाले आहेत. आतापर्यंत १४६५ रुग्णाचा मृत्यू झाला आहे. जिल्ह्यात ऍक्टिव्ह रुग्णाची संख्या ५३० झाली आहे.


मागील काळात झालेल्या ५४७  मृत्यूची अखेर पोर्टलवर नोंद करण्यात आली आहे. त्यात जिल्हा बाहेरील रुग्णालयात व जिल्ह्याबाहेर स्थायिक झालेल्या ३३८ ,कोविड बरा  झाल्यानंतर मृत्यू झालेल्या १०३ आणि इतर कारणामुळे मृत्यू झालेल्या १०६ जणांचा समावेश आहे.