उस्मानाबाद जिल्ह्यात २० ऑगस्ट रोजी ७० कोरोना पॉजिटीव्ह, दोन मृत्यू 

जिल्ह्यात ऍक्टिव्ह रुग्णाची संख्या ७००
 

उस्मानाबाद - उस्मानाबाद  जिल्ह्यात आज २० ऑगस्ट ( शुक्रवार)  रोजी ७०  कोरोना पॉजिटीव्ह रुग्णाची भर पडली आहे तर ९४ रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत तसेच दोन रुग्णाचा मृत्यू झाला. 

उस्मानाबाद जिल्ह्यात आतापर्यंत ६५  हजार ५१० रुग्णाची नोंद झाली असून, पैकी ६२ हजार ८३० रुग्ण बरे झाले आहेत. आतापर्यंत १४४७ रुग्णाचा मृत्यू झाला आहे. जिल्ह्यात ऍक्टिव्ह रुग्णाची संख्या ७०० झाली आहे.

मागील काळात झालेल्या ५३३  मृत्यूची अखेर पोर्टलवर नोंद करण्यात आली आहे. त्यात जिल्हा बाहेरील रुग्णालयात व जिल्ह्याबाहेर स्थायिक झालेल्या ३२६ ,कोविड बरा  झाल्यानंतर मृत्यू झालेल्या १०१ आणि इतर कारणामुळे मृत्यू झालेल्या १०६ जणांचा समावेश आहे.