उस्मानाबाद जिल्ह्यात २५ जुलै रोजी ५० कोरोना पॉजिटीव्ह

 

उस्मानाबाद - उस्मानाबाद जिल्ह्यात आज २५ जुलै  ( रविवार ) रोजी ५० जण कोरोना पॉजिटीव्ह रुग्णाची भर पडली आहे तर ५४ रुग्ण बरे होऊन घरी परतले, तसेच मागील काही दिवसातील पाच मृत्यूची नोंद घेण्यात आली. 


उस्मानाबाद जिल्ह्यात आतापर्यंत ६३ हजार ५०२  रुग्णाची नोंद झाली असून, पैकी ६० हजार ८३८  रुग्ण बरे झाले आहेत. आतापर्यंत १४०९ रुग्णाचा मृत्यू झाला आहे. जिल्ह्यात ऍक्टिव्ह रुग्णाची संख्या ७४१  झाली आहे.

मागील काळात झालेल्या ५१४ मृत्यूची अखेर पोर्टलवर नोंद करण्यात आली आहे. त्यात जिल्हा बाहेरील रुग्णालयात व जिल्ह्याबाहेर स्थायिक झालेल्या ३०९ ,कोविड बरा  झाल्यानंतर मृत्यू झालेल्या १०० आणि इतर कारणामुळे मृत्यू झालेल्या १०५ जणांचा समावेश आहे.