उस्मानाबाद जिल्ह्यात २० जुलै रोजी ४५ कोरोना पॉजिटीव्ह, एक मृत्यू 

उस्मानाबाद जिल्ह्यात कोरोनाने आतापर्यंत १९०७ जणांचा मृत्यू 
 

उस्मानाबाद - उस्मानाबाद जिल्ह्यात आज २० जुलै  ( मंगळवार ) रोजी ४५ जण कोरोना पॉजिटीव्ह रुग्णाची भर पडली आहे तर ५३ रुग्ण बरे होऊन घरी परतले.तसेच दिवसभरात एका रुग्णाचा मृत्यू झाला, तसेच मागील काळात झालेल्या चार मृत्यूची नोंद घेण्यात आली. 

उस्मानाबाद जिल्ह्यात आतापर्यंत ६३ हजार २०१  रुग्णाची नोंद झाली असून, पैकी ६० हजार ५८९  रुग्ण बरे झाले आहेत. आतापर्यंत १३९६ रुग्णाचा मृत्यू झाला आहे. जिल्ह्यात ऍक्टिव्ह रुग्णाची संख्या ७२०  झाली आहे.


मागील काळात झालेल्या ५११ मृत्यूची अखेर पोर्टलवर नोंद करण्यात आली आहे. त्यात जिल्हा बाहेरील रुग्णालयात व जिल्ह्याबाहेर स्थायिक झालेल्या ३०६ ,कोविड  बरा  झाल्यानंतर मृत्यू झालेल्या १०० आणि इतर कारणामुळे मृत्यू झालेल्या १०५ जणांचा समावेश आहे.