उस्मानाबाद जिल्ह्यात १ ऑक्टोबर रोजी ३९ कोरोना पॉजिटीव्ह, एक मृत्यू 

ऍक्टिव्ह रुग्णाची संख्या ३६६
 

उस्मानाबाद - जिल्ह्यात आज १ ऑक्टोबर  ( शुक्रवार ) रोजी ३९ कोरोना पॉजिटीव्ह रुग्णाची भर पडली आहे तर ४९ रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत. तसेच गेल्या २४ तासात एका रुग्णाचा मृत्यू झाला आहे. 

उस्मानाबाद जिल्ह्यात आतापर्यंत ६६ हजार ९४७ रुग्णाची नोंद झाली असून, पैकी ६४ हजार ५३७ रुग्ण बरे झाले आहेत. आतापर्यंत १४८५ रुग्णाचा मृत्यू झाला आहे. जिल्ह्यात ऍक्टिव्ह रुग्णाची संख्या ३६६ झाली आहे.

मागील काळात झालेल्या ५५९ मृत्यूची अखेर पोर्टलवर नोंद करण्यात आली आहे. त्यात जिल्हा बाहेरील रुग्णालयात व जिल्ह्याबाहेर स्थायिक झालेल्या ३४७ ,कोविड बरा  झाल्यानंतर मृत्यू झालेल्या १०५ आणि इतर कारणामुळे मृत्यू झालेल्या १०७ जणांचा समावेश आहे.