उस्मानाबाद जिल्ह्यात १५ रोजी १०५ कोरोना पॉजिटीव्ह , ८ मृत्यू
उस्मानाबाद - उस्मानाबाद जिल्ह्यात आज १५ जून ( मंगळवार ) रोजी १०५ जण कोरोना पॉजिटीव्ह रुग्णाची भर पडली आहे तर १९५ रुग्ण बरे होऊन घरी परतले. तसेच दिवसभरात २ जणांचा मृत्यू झाला तर मागील काही दिवसातील ६ मृत कोरोना रुग्णाची नोंद झाली आहे. जिल्ह्यात कोरोना रुग्णाची संख्या घटली तरी मृत्यू संख्या जैसे थे आहे, त्यामुळे संताप व्यक्त केला जात आहे.
उस्मानाबाद जिल्ह्यात आतापर्यंत ५७ हजार ८ रुग्णाची नोंद झाली असून, पैकी ५५ हजार ७७ रुग्ण बरे झाले आहेत. आतापर्यंत १३३९ रुग्णाचा मृत्यू झाला आहे. जिल्ह्यात ऍक्टिव्ह रुग्णाची संख्या ५९२ झाली आहे.
आकडेवारी लपविली
गेल्या २५ दिवसापासून मागील मृत्यूची दररोज किमान ४ ते ६ रुग्णाची नोंद होत आहे. एकीकडे कोरोना रुग्ण दोनशेच्या आत आले असताना, मागील मृत्यू नेमके कुठून येत आहेत , मागील काळात आरोग्य विभागाने मृत्यूचे आकडे लपविले होते का ? असा प्रश्न विचारला जात आहे.
मागील महिन्यात दररोज २० पेक्षा अधिक लोकांचा मृत्यू होत होता, तेव्हा आरोग्य विभागाने मृत्यूचे आकडे लपविले होते आणि आता मृत्यू संख्या कमी झाल्यानंतर दररोज मागील मृत्यूची नोंद करण्यात येत आहे. मागील मृत्यू काय ते एकदाच नोंद करा आणि एकदाची आकडेवारी संपवा, अशी संतापजनक मागणी होत आहे.