बिहारमधील एका खेड्यात चक्क वटवाघूळाची पूजा !

 
बिहारमधील एका खेड्यात चक्क वटवाघूळाची पूजा !

 पाटणा  - कोरोना विषाणूने संपूर्ण जगभर भयंकर थैमान घातलेले आहे. कोरोना नावाचा हा एक साथीचा रोग थांबायचं नावच घेत नाहीये. जगात या कोरोनाच्या साथीमुळे आतापर्यंत 24 हजारांहून अधिक लोकांचा मृत्यू झाला आहे, तर संक्रमित रूग्णांची संख्या पाच लाखाहून अधिक आहे. कोरोनाच्या प्रसाराचे एक कारण  लोक वटवाघूळालाच कारणीभूत ठरवतायत ही गोष्ट तुम्हाला माहिती असेलच पण तुम्हाला हे जाणून थोडे आश्चर्य वाटेल की, आपल्या देशात असेही एक गाव आहे की जेथे लोक वटवाघूळाची पूजा करतायत.

सरसाई नावाचे एक गाव  (रामपूर रत्नाकर) आहे, हे गाव बिहारमध्ये आहे. कोरोना सारख्या साथीच्या आजारांपासून वटवाघूळ वाचवतात असा या खेड्यातील लोकांचा विश्वास आहे तसेच ज्या ठिकाणी वटवाघूळे राहत आहेत तेथे पैशांची कमतरता होत नाही असेही त्या लोकांचे म्हणणे आहे.तसेच या भागात राहणारे वटवाघूळे ही त्यांच्या संपूर्ण गावाला संरक्षण देतात. जर गावात कोणतेही शुभ कार्य  असेल तर ते करण्यापूर्वी लोक पहिले वटवाघूळांची पूजा करतात, जेणेकरून सर्व कार्य चांगली पार पडतील.

सरसाई गावातील तलावाच्या काठावर पिंपळाच्या झाडाजवळ शेकडो वटवाघळे राहतात. गावकऱ्यांच्या म्हणण्यानुसार, रात्रीच्या वेळी या गावात जर इतर कोणी व्यक्ती आली तर ही आवाज काढण्यास सुरूवात करतात. ही वटवाघळे किती काळ सरसाईमध्ये राहत आहेत याबद्दल कोणालाही काही माहिती नाही. परंतु एका कथेनुसार मध्ययुगीन काळात एकदा वैशालीमध्ये साथीचे रोग पसरले होते तेव्हा वटवाघळे कुठुनतरी इकडे उडून आली आणि नंतर ती कायमची येथेच स्थायिक झाली.

From around the web