डॉ. पद्मसिंह पाटील यांच्यामुळेच आपण राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात आलो 

जितेंद्र आव्हाड यांनी घेतली  डॉ. पद्मसिंह पाटील यांची भेट , जागवल्या जुन्या आठवणी 
 
s

डॉ. पद्मसिंह पाटील कुठे आहेत,कोणत्या पक्षात आहेत, या गोष्टीशी मला काही घेणे - देणे नाही 

धाराशिव - राष्ट्रवादी पक्षाचे सर्वेसर्वा शरद पवार यांचे विश्वासू सहकारी म्हणून डॉ. पद्मसिंह पाटील यांची ओळख होती, जिकडे शरद पवार तिकडे डॉ. पद्मसिंह पाटील हे सूत्र होते. विरोधी पक्षनेते अजित पवार यांच्या पत्नी सुनेत्रा पवार या  डॉ. पद्मसिंह पाटील यांची भगिनी , त्यामुळे पवार यांच्याशी पाटील यांचे नातेसंबंध देखील आहेत, 

२०१९ च्या विधानसभा निवडणुकीत डॉ. पद्मसिंह पाटील यांचे चिरंजीव राणा जगजितसिंह पाटील यांनी राष्ट्रवादी काँग्रेसला रामराम ठोकून भाजपमध्ये प्रवेश केला. डॉ. पद्मसिंह पाटील यांनी मात्र राजकीय संन्यास घेतला. मात्र तेव्हापासून शरद पवार आणि डॉ.  डॉ. पद्मसिंह पाटील हे एकत्र कधीच दिसले नाहीत. इतकेच काय राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते देखील आजवर फटकून वागत होते. 

d

मात्र आज  अचानक राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते जितेंद्र आव्हाड यांनी धाराशिवमध्ये डॉ. पद्मसिंह पाटील  यांची भेट घेऊन वाढदिवसानिमित्त शुभेच्छा दिल्या, इतकेच काय तर फेसबुकवर एक पोस्ट देखील लिहिली आहे. आज डॉ. पद्मसिंह पाटील  कुठे आहेत,कोणत्या पक्षात आहेत...या गोष्टीशी मला काही घेणे-देणे नाही.त्यांनी मला माझ्या उभरत्या काळात जी साथ दिली,माझ्या पाठीवर जो प्रेमाचा आणि मायेचा हात ठेवला,मला पवार साहेबांच्याकडे ते घेवून गेले..या सर्वांची उतराई होन कठीण आहे,आणि त्यांच्या या ऋणातून मुक्त व्हायची माझी देखील इच्छा नाही, असे या पोस्टमध्ये म्हटले आहे. 

संपूर्ण पोस्ट अशी, 

s

आज तुळजाभवानीच दर्शन घेतले  आणि तिथून थेट डॉ.पद्मसिंह पाटील साहेब उस्मानाबादेत आहे,हे समजलं आणि त्यांना भेटण्याच्या ओढीने त्यांच्या घराकडे निघालो.त्यांना भेटायला जात असताना अनेक क्षण माझ्यासमोर तरळत होते.यातील काही क्षण भावनिक होते तर काही खूप काही शिकवणारे.परंतु याच सगळ्या अनुभवांनी डॉक्टर साहेबांनी माझ्यातला कार्यकर्ता घडवला.

माझ्या कारकिर्दीच्या सुरवातीस मी कोण आहे,कुठला आहे,कोणत्या जातीचा आहे हे न बघता..फक्त मोठ्या विश्वासाने आणि मायेने त्यांनी माझ्या पाठीवर हात ठेवला होता.त्या हातांनी मला माझ्या राजकीय कारकीर्दीत मोठा आत्मविश्वास दिला..आणि कोणत्याही परिस्थितीत ठामपणे उभे राहण्याची शिकवण दिली.1990 सालच्या काँग्रेस मधील बंडाचा आणि त्यात डॉक्टर साहेबांनी घेतलेल्या भूमिकेचा मी साक्षीदार आहे.त्यांनी ज्या पद्धतीने त्यावेळी किल्ला लढवला होता,ते प्रसंग आठवले तरी अंगावर काटे उभे राहतात.तीच गोष्ट 1993 साली पवार साहेब मुख्यमंत्री होत असताना देखील पुढे मी आणि माझ्यासकट अनेकांनी अनुभवली होती.

आज ते कुठे आहेत,कोणत्या पक्षात आहेत...या गोष्टीशी मला काही घेणेदेेन नाही.त्यांनी मला माझ्या उभरत्या काळात जी साथ दिली,माझ्या पाठीवर जो प्रेमाचा आणि मायेचा हात ठेवला,मला पवार साहेबांच्याकडे ते घेवून गेले..या सर्वांची उतराई होन कठीण आहे,आणि त्यांच्या या ऋणातून मुक्त व्हायची माझी देखील इच्छा नाही.

त्यांच्याइतके दिलदार,निस्वार्थी माणसे हे आजच्या काळात अत्यंत दुर्मिळ झाले आहेत.त्याच्यासोबत जगलेले ते अनमोल क्षण परत येणार नाहीत,ही जाणीव त्रासदायक आहे.डॉ.साहेबांनी मला घडवल,माझ्यातला कार्यकर्ता घडवला..! आज त्यांना भेटलो,वाईट वाटल..! मी पाहिलेले,अनुभवलेले डॉक्टर साहेब आता थकलेत.त्यांनी कधीच थकू नये अस मनापासून वाटत असल तरी ते आपल्या हातात नाही.हे फोटो टिपले.मीच आवर्जून काढून घेतले.माझ्यासाठी हा अनमोल ठेवा आहे.

-  जितेंद्र आव्हाड 

 

 

From around the web