सरकारी कर्मचार्‍यांचे घरातून काम सुरू ...

 
कोरोनाग्रस्तांची संख्या 181

 सरकारी कर्मचार्‍यांचे घरातून काम सुरू ...


भारतात कोरोना व्हायरसची पहिली घटना 25 फेब्रुवारी रोजी उघडकीस आली. आजपर्यंत  देशभरात या व्हायरसचा प्रादुर्भाव सततच वाढताना दिसतोय. गुरुवारपर्यंत कोरोनाच्या मृतांचा आकडा 4 झाला आहे तर संक्रमित रूग्णांची संख्या 181 वर पोहोचली आहे. त्यामध्ये महाराष्ट्रात संक्रमित रूग्णांची संख्या सर्वाधिक आहे.
 महाराष्ट्रातील कोरोना रूग्णांची संख्या आता 49 झाली आहे. केंद्र सरकार कोरोना आजार रोखण्यासाठी सर्वच आघाड्यांवर काम करत आहे. खबरदारी म्हणूनही अनेक निर्णयही घेतले गेले आहेत.परंतु दिवसेंदिवस परिस्थिती नियंत्रणातून बाहेर चालली आहे.   या कोरोना व्हायरसशी सामना करण्यासाठी ,   सरकारी कार्यालयांनी 50% कर्मचार्‍यांना कार्यालयात येऊन काम करण्याचा एक मोठा निर्णय  सरकारने  घेतला आहे तसेच सरकारने सरकारी कर्मचार्‍यांना घरातूनच काम करण्याची मुभा दिलेली आहे.

केंद्र सरकारच्या कर्मचारी विभागाने- डीओपीटीने एक परिपत्रक काढूनच त्याविषयी माहिती दिलेली आहे. ज्यामध्ये असे नमूद केले आहे की ग्रुप बी आणि सी मधील केवळ 50% कर्मचार्‍यांना एक दिवसाआड आळीपाळीने कार्यालयांत बोलावले जाईल. उर्वरित कर्मचारी घरून काम करतील. कार्मिक विभागाने जारी केलेल्या सल्लागारात असे सांगितले गेले आहे की दिवसभरात केवळ 50 टक्के कर्मचारीच वेगवेगळ्या शिफ्टमध्ये कार्यालयात कार्यरत रहातील.

सरकारने खासगी कंपन्यांनाही घरून काम करण्याची मुभा देण्यात आली आहे. या निर्णयामुळे कोरोनाच्या प्रादुर्भावाला आळा बसू शकेल असा सरकारचा विश्वास आहे. अनेक खासगी कंपन्यांनी आपल्या कर्मचार्‍यांना घरून काम करण्याची परवानगीही दिली आहे. अनेक आयटी कंपन्यांनी आपल्या कर्मचाऱ्यांना घरून काम करण्यास सांगितले आहे.

कोरोनामुळे 9 हजाराहून अधिक लोकांचा मृत्यू
 कोरोना व्हायरसमुळे जगभरात घबराटीचे वातावरण निर्माण झाले आहे. तसेच कोरोनाचा भारतावरही परिणाम झालाच आहे. महत्त्वाचे म्हणजे कोरोनामुळे जगातील मृत्यू पावलेल्यांची संख्या 9 हजारांच्या पुढे गेली आहे तर आशियामध्ये 3416 लोकांचा केवळ कोरोनामुळे बळी गेला आहे. चीनमधून उदयास आलेल्या या कोरोना व्हायरसने आज संपूर्ण जगालाच संकटात खेचलेले आहे.

From around the web