शेतकऱ्यासाठी महत्वाची बातमी : तरच पीक विमा मिळेल ... 

 
pik vima

धाराशिव - प्रधानमंत्री पीक विमा योजना खरीप हंगाम 2023 अंतर्गत धाराशिव जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी 7 लक्ष 57 हजार 853 अर्जाद्वारे पिक विमा योजनेत सहभाग नोंदवून 5 लक्ष 99 हजार 411 हेक्टर क्षेत्र संरक्षित केलेले आहे.या योजनेअंतर्गत पिकाच्या पेरणीपासून ते काढणीपर्यंतच्या कालावधीत पिकांची पेरणी किंवा लावणी न झाल्यामुळे होणारे नुकसान, हंगामातील प्रतिकुल परिस्थितीमुळे पिकांचे होणारे नुकसान,स्थानिक आपत्तीमुळे होणारे नुकसान, काढणीपश्चात होणारे नुकसान इत्यादी बाबीअंतर्गत पिकांना संरक्षण दिले जाते.

         पिकांची पेरणी किंवा लावणी न झाल्यामुळे होणारे नुकसान, हंगामातील प्रतिकुल परिस्थितीमुळे पिकांचे होणारे नुकसान या बाबी अंतर्गत नुकसानीच्या पूर्वसूचना देण्याची आवश्यकता नसते.स्थानिक आपत्तीमुळे होणारे नुकसान या बाबी अंतर्गत क्षेत्र दिर्घकाळ जलमय होऊन पूर,गारपीट,ढगफूटी,भूस्खलन,वीज कोसळून लागणाऱी नैसर्गिक आग, ओसंडून वाहणारी विहीर किंवा पुराचे पाणी शेतात शिरुन पूरस्थिती निर्माण होणे तर काढणीपश्चात होणारे नुकसान या बाबी अंतर्गत पिक कापणी करुन सुकवणीसाठी पसरवून ठेवलेल्या पिकासाठी जास्तीत जास्त 2 आठवड्यापर्यंत गारपीट, चक्रीवादळ,चक्रीवादळामुळे पडलेला पाऊस,अवकाळी पाऊस इत्यादीमुळे पिकांचे नुकसान झाल्यास वैयक्तीक स्तरावर नुकसानीचे पंचनामे करुन नुकसान भरपाई देण्याची तरतूद आहे.   

                  याकरीता शेतकऱ्यांनी नुकसानीची घटना घडल्यापासून 72 तासाच्या आत नुकसानीच्या पूर्वसूचना वरील नमूद कारणापैकी योग्य ते कारण नमूद करुन संबंधित विमा कंपनीस देणे बंधनकारक आहे. मागील 3 वर्षाचा अनुभव पाहता शेतकऱ्याकडून नुकसानीच्या पूर्वसूचना देत असताना योग्य ते नुकसानीचे कारण नमूद न केल्यामुळे पूर्वसूचना अपात्र होण्याचे प्रमाण जास्त आहे.यासाठी शेतकऱ्यांनी पिक नुकसानीची पूर्वसुचना देताना नुकसानीचे नमूद केलेले कारण योग्य असल्याची खात्री करुनच नुकसानीची पूर्वसूचना द्यावी. 

                   धाराशिव जिल्ह्यासाठी एच.डी.एफ.सी.एर्गो या इंशुरंन्स कंपनीची नियुक्ती झाली आहे. या कंपनीने नुकसानीच्या पूर्वसूचना देणेकरीता व्हाट्सअप मित्र “पिहू”  ही सेवा चालू केलेली आहे. शेतकऱ्यांनी विमा कंपनीचा मोबाईल नंबर 7304524888  हा आपल्या मोबाईलमध्ये सेव्ह करुन व्हाट्सअपद्वारे Hi टेक्स्ट मेसेज पाठवून आपल्या पिक विमा  योजनेबाबत पडणाऱ्या विविध प्रश्नांची उत्तरे व पीक विमा योजनेचा सहभाग नोंदवल्यास त्याबद्दलची माहीती मिळू शकते.

               या सेवेमार्फत आपल्याला प्रधानमंत्री पीक योजनेमध्ये सहभाग नोंदवल्यानंतर आपल्या अर्जाच्या स्थितीबद्दल माहीती मिळवू शकते. शेतकऱ्यांना अत्यंत सोप्या पध्दतीने पिक नुकसानीची पूर्वसूचना/तक्रार देता येते, शेतकऱ्यांना पिक नुकसानीची पूर्वसूचना/तक्रार दिल्यांनतर सर्वेक्षण स्थिती किंवा पीक नुकसान भरपाई दावा रक्कम स्थिती इत्यादी माहीती मिळू शकते.    

                  शेतकऱ्यांनी नुकसानीची पूर्वसुचना देण्याकरीता विमा कंपनीच्या मोबाईल नंबर 7304524888 यावर व्हाट्सअप द्वारे Hi टेक्स्ट मेसेज पाठविल्यानंतर खालीलप्रमाणे योग्य पर्याय निवडून/नमूद करुन नुकसानीची पूर्वसुचना द्यावी.मेन्यू – Menu,क्लेम रजिस्ट्रेशन - Claim Registration, गुगल क्रोम Google Chrome,ॲप्लीकेशन नंबर/बँक आकाउंट नंबर - Application number /Bank Account Number - विमा पावतीचा क्रमांक किंवा  बँक आकाउंट नंबर नमूद करावाआधार कार्डचे किंवा मोबाईल नंबरचे शेवटचे चार अंक/Last Four digit of  Adhar card/ Mobile number,सलेक्ट ॲप्लीकेशन नंबर/Select Application number - विमा पावताचा क्रमांक निवडावा, सिलेक्ट टाईप ऑफ कव्हरेज/Select type of Coverage- नुकसानीची बाब निवडताना स्थानिक आपत्ती (Localised calamities)  किंवा काढणी पश्चात (Post Harvest)  यापैकी एक योग्य पर्याय नमूद करावा. नुकसानीचे कारण नमूद करताना क्षेत्र दिर्घकाळ जलमय होऊन गारपीट, ढगफूटी,ओसंडून वाहणारी विहीर किंवा पुराचे पाणी शेतात शिरुन गारपीट,चक्रीवादळ, चक्रीवादळामुळे पडलेला पाऊस, अतिपाऊस यापैकी योग्य पर्याय निवडून नुकसानीचे कारण नमूद करावे,सलेक्ट लाईफ सायकल/Select life cycle - पिकाची अवस्था निवडताना  पेरणीपूर्वी (Presowing), पेरणी  (Sowing), उगवण(Germination),वाढीची अवस्था(Vegetative), फुलोरा(Reproductive/Flowering), पक्वता(maturity) यापैकी योग्य तो पर्याय निवडून पिकाची अवस्था नमूद करावी. नुकसानीची तारीख/Date of loss नुकसानीची तारीख नमूद करताना पाऊस पडल्यापासून 72 तासाच्या आतील तारीख नमूद करावी.पेरणीची तारीख/Sowing Date नमूद करणे. संपर्कासाठी व्यक्तीचे नाव/Contact person name नमूद करणे. मोबाईल नंबर/Mobile Number नमूद करणे.सबमिट/Submit, सक्सेस/Succes. वरील पध्दतीचा अवलंब करुन शेतकऱ्यांनी नुकसानीची पूर्वसूचना देऊ शकतात तसेच विमा कंपनीचा टोल फ्री क्रमांक 18002660700 वर,  pmfby.maharashtra@hdfcergo.com या ईमेल आयडीवर, विमा कंपनीच्या तालुकास्तरावरील कार्यालयात, तालुका कृषि अधिकारी कार्यालयात देखील लेखी स्वरुपात शेतकरी नुकसानीची पूर्वसूचना देऊ शकतात.करीता शेतकऱ्यांनी वरील पध्दीतीचा अवलंब करुनच नुकसानीची पूर्वसूचना द्यावी.असे आवाहन शेतकऱ्यांना कृषि विभागाने केले आहे.

From around the web