प्रधानमंत्री पीक विमा योजनेत एक रुपया भरुन शेतकऱ्यांना सहभाग घेता येणार

 
ds

 धाराशिव  - प्रधानमंत्री पीक विमा योजना Cup & amp; Cap Model (80:110) नुसार खरीप 2023 ते रब्बी 2025-26 हंगामासाठी 3 वर्षासाठी अधिसूचित क्षेत्रातील अधिसूचित पिकांसाठी विमा क्षेत्र घटक (Area Approach) धरुन राबविण्याचा निर्णय शासनाने घेतलेला आहे.

प्रधानमंत्री पीक विमा योजनेअंतर्गत शेतकऱ्यांनी भरावयाचा विमा हप्ता हा केंद्र शासनाने खरीप हंगामासाठी 2 टक्के, रब्बी हंगामासाठी 1.5 टक्के तसेच खरीप व रब्बी हंगामातील नगदी पिकांसाठी 5 टक्के असा मर्यादित ठेवला आहे. तथापि, 2023-24 पासून “सर्वसमावेशक पीक विमा योजना” राबविण्याचा निर्णय राज्य शासनाने घेतला आहे. त्याअनुषंगाने राज्य शासनामार्फत सदरचा शेतकरी हिस्स्याचा भार सुध्दा शेतक-यांवर न ठेवता, त्यांच्या हिस्स्याची विमा हप्ता रक्कम राज्य शासनामार्फत भरण्याबाबतचा निर्णय घेण्यात आला आहे. त्यामुळे शेतक-यांना केवळ एक रुपया भरून पीक विमा पोर्टलवर नोंदणी करता येईल.

या योजनेअंतर्गत अन्नधान्य पिके, गळीत धान्य पिके आणि नगदी पिकांना विमा संरक्षण मिळेल. ही योजना राज्यात शासनाने खरीप हंगामामधील 14 पिके, रब्बी हंगामामधील 6 पिकांकरीता अधिसूचित केलेल्या महसुल मंडळ, मंडळगट किंवा तालुकास्तरावर अधिसूचित पिकांसाठी राबविण्यात येईल.

From around the web