बोगस बियाणे न उगवल्यामुळे ३ एकर शेतीचे क्षेत्र ओसाड

कळंब तालुक्यातील शिराढोण येथील घटना
 
s

शिराढोण  - कळंब तालुक्यातील शिराढोण येथील शेतकरी ताजखॉंन नशीबखॉंन पठाण यांनी शिराढोण येथील महावीर कृषी सेवा केंद्रातून ७२६ वाणाच्या सोयाबीनच्या २ बॅगा खरेदी केल्या होत्या. ते खरेदी केलेल्या बियाणांची त्यांच्या शेतामध्ये पेरणी केली. मात्र १५ दिवस उलटूनही सोयाबीन उगवलेले नसल्यामुळे ते क्षेत्र ओसाड पडले आहे. त्यामुळे संबंधित दुकानदार बियाणे कंपनी यांच्यावर कारवाई करून नुकसान भरपाई देण्यात यावी अशी मागणी शेतकऱ्याने केली आहे.

कळंब तालुक्यातील शिराढोण येथील कृषी सेवा केंद्रातून दि.२६ जून रोजी यशोदा कंपनीच्या सोयाबीन बियाणांच्या २ बॅगा दर प्रत्येकी ३५०० रुपये प्रमाणे ७ हजार देऊन खरेदी केल्या होत्या. त्याच बियाणांची पठाण यांनी त्यांच्या शेतामध्ये पेरणी केली. मात्र ते  उगवला नसल्यामुळे याबाबत संबंधित बियाणे दुकानदाराकडे जाऊन विचारणा केली असता दुकानदाराने सोयाबीन कंपनीवर केस करा, आमचा काय संबंध नाही अशा प्रकारे उडवाडीचे व उद्धटपणे उत्तर देऊन पठाण यांचा अपमान केला. 

त्यामुळे शेतकरी पठाण यांनी तालुका कृषी अधिकारी यांच्याकडे धाव घेऊन संबंधित दुकानदार व बियाणे कंपनीवर तक्रार नोंदवली आहे. मात्र संबंधित तक्रारीची दखल अद्याप शासनाने घेतली नसल्यामुळे शेतकऱ्यातून तीव्र समता व्यक्त होत आहे.त्यामुळे या तक्रारीची शासनाने तात्काळ दखल घेऊन पंचनामा करून कंपनीवर कारवाई करावी अशी मागणी पठाण यांनी केली आहे.

From around the web