विविध गुन्ह्यातील पाहिजे (Wanted) आरोपी अटकेत

 
Osmanabad police

उस्मानाबाद  -   गुन्हा करुन फरार झालेल्या आरोपींच्या शोधार्थ मा. पोलीस अधीक्षक श्री राज तिलक रौशन यांच्या मार्गदर्शनाखाली वेळोवेळी कोम्बिंग ऑपरेशन राबवले जात आहे. यातूनच स्था.गु.शा. चे पोनि- श्री. गजानन घाडगे यांच्या पथकातील सपोनि- श्री मनोज निलंगेकर, पोहेकॉ- काझी, साळुंके, पोना- दिपक लाव्हरेपाटील, पोकॉ- पांडुरंग सावंत, बलदेव ठाकुर, माने यांनी आज दि. 09 जून रोजी पहाटे च्या सुमारास अशा आरोपींना ताब्यात घेण्यासाठी कोम्बिंग ऑपरेशन आखले.

 यात उस्मानाबाद (ग्रा.) पो.ठा. येथील सन- 2014 मधील गुन्ह्यात फरारी असलेला माणिक रामचंद्र राठोड, रा. गंधोरा, ता. तुळजापूर यासह सन- 2016 मधील स्वतंत्र चार गुन्ह्यांतील फरार आरोपी- संजय तारु जाधव, दिनेश देवीदास राठोड  उर्फ धनु, रंगनाथ चंदू जाधव, शाम रामचंद्र पवार, चौघे रा. उस्मानाबाद यांस वेगवेगळ्या ठिकाणांहुन ताब्यात घेउन उस्मानाबाद (ग्रा.) पो.ठा. च्या ताब्यात दिले आहे.

 
रात्रगस्ती दरम्यान दोघे संशयीत ताब्यात

 वाशी: वाशी पो.ठा. चे पथक दि. 08.06.2021 रोजी 03.00 वा. सु. रात्रगस्तीस असतांना सरमकुंडी शिवारात राष्ट्रीय महामार्ग क्र. 52 वरील स्वराज हॉटेल जवळ 1)प्रकाश श्रीमंत शिंदे 2)सिकंदर रामा शिंदे, दोघे रा. बारलोणी पारधी पिढी, वाशी हे संशयास्पदरित्या आढळले. अशा अवेळी महामार्गालगत उपस्थित असण्याच्या कारणांबाबत पथकाने त्यांस विचारले असता ते दोघे असंबध्द माहिती देत असल्याने त्यांना अटक करुन त्यांच्याविरुध्द महाराष्ट्र पोलीस अधिनियम कलम- 122 (अ), (ब), (क) अंतर्गत गुन्हा नोंदवला आहे.

From around the web