उस्मानाबाद जिल्ह्यात कोविड नियमाचे उल्लंघन

तीन आरोपींस आर्थिक दंडाची शिक्षा
 
Osmanabad police

उस्मानाबाद -  कोविड-19 संबंधी मनाई आदेशांचे उल्लंघन करुन कोविड संसर्गाची शक्यता निर्माण करुन भा.दं.सं. कलम- 188, 269 चे उल्लंघन केल्याप्ररकणी 1) मुस्ताफा लायक तांबोळी 2) दत्ता काशिनाथ तोडकरी या दोघांना अनुक्रमे 200 ₹ व 300 ₹ दंड व दंड न भरल्यास एक दिवस साध्या कारावासाची शिक्षा तसेच सार्वजनिक रस्त्यावर बेदरकारपने वाहन चालवून भा.दं.सं. कलम- 279 चे उल्लंघन केल्याप्रकरणी 3)सतिश सुभाष राठोड यांना 500 ₹ दंड व दंड न भरल्यास एक दिवस साध्या कारावासाची शिक्षा प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी, उस्मानाबाद यांनी दि. 13 जुलै रोजी सुनावल्या आहेत.

 कोवीड मनाई आदेश झुगारुन पानटपरी चालू ठेवणाऱ्यावर गुन्हा दाखल

आंबी : कोविड-19 च्या पार्श्वभुमीवर अध्यक्ष जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण, उस्मानाबाद यांनी विविध मनाई आदेश जारी केले आहेत. असे असतांनाही ते मनाई आदेश झुगारुन नेताजी उत्तरेश्वर वाघमारे, रा. कुक्कडगाव, ता. परंडा यांनी दि. 13 जुलै रोजी 16.55 वा. सु. गावातील आपली पानटपरी व्यवसायास चालू ठेवली. यावरुन पोलीसांनी सरकारतर्फे दिलेल्या प्रथम खबरेवरुन नमूद व्यक्तीविरुध्द भा.दं.सं. कलम- 188, 269 अंतर्गत गुन्हा नोंदवला आहे.

धोकादायकपने माल वाहतुक करणाऱ्या चालकावर गुन्हा दाखल

 कळंब : गोरख विठ्ठल कोळी, रा. लोहटा (प.), ता. कळंब यांनी दि. 13 जुलै रोजी 13.00 वा. सु. तहसिल कार्यालय, कळंब समोरील रस्त्यावर ॲपे मॅजीक वाहन क्र. एम.एच. 24 जे 7714 मध्ये फाळक्याबाहेर लोखंडी सळया आलेल्या स्थितीत वाहतुक करुन रहदारीस धोका निर्माण होईल असे निष्काळजीपनाचे कृत्य केले. यावरुन पोलीसांनी सरकारतर्फे दिलेल्या प्रथम खबरेवरुन भा.दं.सं. कलम- 283 अंतर्गत गुन्हा नोंदवला आहे.

From around the web