उस्मानाबादेतील दोन गुन्ह्यातील दोन पाहिजे - फरार आरोपी अटकेत

 
उस्मानाबादेतील दोन गुन्ह्यातील दोन पाहिजे - फरार आरोपी अटकेत

उस्मानाबाद - उस्मानाबाद (श.) गु.र.क्र. 75 / 2008 भा.दं.सं. कलम- 452, 143, 147, 148 या बेकायदेशीर जमाव जमवून मारहाण केल्याच्या गुन्ह्यातील आरोपी- प्रताप मुरलीधर गायकवाड उर्फ प्रशांत,  वय 33 वर्षे, रा. कल्पनानगर, कळंब हा गेली 12 वर्ष पोलीसांना हवा होता. त्यास स्था.गु.शा. च्या पथकाने आज 22 मार्च रोजी कळंब परिसरातून ताब्यात घेउन पुढील कार्यवाहस्तव उस्मानाबाद (श.) पो.ठा. च्या ताब्यात दिले आहे.

            दुसऱ्या घटनेत बेंबळी पो.ठा. गु.र.क्र. 56 / 2006 या चोरीच्या गुन्ह्यातील आरोपी- कालीदास बबरु काळे उर्फ काल्या वय 34 वर्षे, रा. मंगरुळ, ता. कळंब हा गेली 15 वर्षापासून फरार असल्याने पोलीस त्याचा शोध घेत होते. स्था.गु.शा. च्या पथकाने शिताफीने तपासकरुन मिळालेल्या गोपनिय माहितीच्या आधारे त्यास पकडण्यासाठी मंगरुळ शिवारात सापळा रचून त्यास 22 मार्च रोजी ताब्यात घेउन पुढील कारवाईस्तव बेंबळी पोलीसांच्या ताब्यात दिले आहे.

 ही कारवाई स्था.गु.शा. चे पोनि- श्री गजानन घाडगे यांच्या मार्गदर्शनाखाली पोउपनि- श्री पांडुरंग माने, पोना- हुसेन सय्यद, अमोल चव्हाण, कावरे, पोकॉ- अविनाश मरलापल्ले, आरसेवाड यांच्या पथकाने केली आहे.

बेदरकारपेण वाहन चालवणाऱ्यास 300 ₹ दंडाची शिक्षा

उस्मानाबाद (ग्रा.): मानवी जिवीतास धोका निर्माण होईल अशा प्रकारे सार्वजनिक ठिकाणी निष्काळजीपणे, बेदरकारपणे वाहन चालवून भा.दं.सं. कलम- 279 चे उल्लंघन केल्याबद्दल आरोपी- समाधान सुरेश देशमुख, रा. येडशी, ता. उस्मानाबाद यांना 1,000 ₹ दंडाची शिक्षा प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी, उस्मानाबाद यांनी 22 मार्च रोजी सुनावली आहे.

From around the web