चोरीच्या 150 सौर पाट्यांसह दोन आरोपी 48 तासांत ताब्यात

 
SD

उस्मानाबाद -  उस्मानाबाद तालुक्यातील कौंडगाव एमआयडीसी शिवारातील गुदामातील 150 सौरऊर्जा तबकड्या (किं.अं. 8,23,950 ₹) अज्ञात व्यक्तीने दि. 10 जुलै पुर्वी चोरुन नेल्याने सुरक्षा पर्यवेक्षक- शिवाजी पवार यांच्या दि. 10 जुलै रोजीच्या प्रथम खबरेवरुन उस्मानाबाद (ग्रा.) पो.ठा. येथे गु.र.क्र. 168 / 2021 भा.दं.सं. कलम- 379 प्रमाणे नोंदवण्यात आला आहे.

            तपासादरम्यान स्था.गु.शा. च्या पोनि- गजानन घाडगे यांच्या मार्गदर्शनाखालील सपोनि-मनोज निलंगेकर, पोउपनि- श्री. सदानंद भुजबळ, पोहेकॉ- काझी, धनंजय कवडे, पोना- दिपक लाव्हरेपाटील, सुभाष चौरे, पोकॉ- अशोक ढगारे, बलदेव ठाकुर, पांडुरंग सावंत, सर्जे यांच्या पथकाने गुन्ह्याच्या कार्यपध्दतीचा अभ्यास केला. दरम्यान खबऱ्यामार्फत मिळालेल्या गोपनीय माहितीच्या आधारे नमूद चोरीच्या सोलार पाट्यांसह कौंडगाव येथील 1) बालाजी दगडु थोरात, वय 33 वर्षे 2) हुसेन ईनुस सय्यद, वय 22 वर्षे या दोघांना दि. 11 जुलै रोजी कौंडगाव परिसरातून ताब्यात घेउन पुढील कार्यवाहिस्तव उस्मानाबाद (ग्रा.) पो.ठा. च्या ताब्यात दिले असून त्यांच्या उर्वरीत साथीदारांचा पोलीस शोध घेत आहेत.

  सार्वजनिक रस्त्यावर निष्काळजीपणाचे कृत्य करणाऱ्यास 200 ₹ दंडाची शिक्षा

उस्मानाबाद - नानासाहेब मिटु मुंडे, रा. उक्कडगाव, ता. उस्मानाबाद यांनी सार्वजनिक रस्त्यावर रहदारीस धोका, अडथळा निर्माण होईल अशा रितीने वाहन उभे करुन भादसं कलम 283 चे उल्लंघन केल्याप्रकरणी त्यांना प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी, उस्मानाबाद यांनी 200 रुपये दंडाची शिक्षा सुनावली आहे.

From around the web