उस्मानाबाद जिल्ह्यात दोन अल्पवयीन मुलींचे अपहरण 

 

उस्मानाबाद - जिल्ह्यातील दोन वेगवेगळ्या गावांतील दोन 15 वर्षीय मुलींचे (नाव- गाव गोपनीय) 26 मार्च रोजी 11.00 व 19.30 वा. सु. अज्ञात व्यक्तीने अज्ञात कारणासाठी अपहरण केले आहे. अशा मजकुराच्या दोन्ही अपहृत मुलींच्या पालकांनी 27 मार्च रोजी संबंधीत पो.ठा. येथे दिलेल्या स्वतंत्र 2 प्रथम खबरेवरुन भा.दं.सं. कलम- 363 अंतर्गत गुन्हे नोंदवले आहेत.

 
चोरी

 नळदुर्ग: हैद्राबाद- कोल्हापुर माल वाहतुक करणारा ट्रक क्र. ए.पी. 29 टी 9052 हा 26- 27 मार्च दरम्यानच्या रात्री नळदुर्ग घाटातील मारुती मंदीराजवळ थांबला असता ट्रक मधील तांबा पट्टी वेटोळे- 7 नग अज्ञाताने चोरुन नेले. अशा मजकुराच्या व्यावसायीक- महंमद असलम बाबुमियॉ, रा. पानमंडी, हैद्राबाद यांनी दिलेल्या प्रथम खबरेवरुन भा.दं.सं. कलम- 379 अंतर्गत गुन्हा नोंदवला आहे.

 
अपघात

परंडा: मंगेश संदिपान माने, रा. साडेसांगवी, ता. भुम हे 17 मार्च रोजी 19.30 वा. सु. वारदवाडी- भुम रस्त्यावरील आष्टा फाटा येथील रस्त्याने पायी जात होते. यावेळी अज्ञात चालकाने मोटारसायकल क्र. एम.एच. 13 सीआर 4319 ही निष्काळजीपणे, हयगईने चालवून मंगेश माने यांना पाठीमागून धडक दिल्याने ते गंभीर जखमी होउन मयत झाले. या अपघातानंतर नमूद मो.सा. चा अज्ञात चालक अपघातस्थळावरुन पसार झाला. असे निवेदन मयताचे पिता- संदिपान दत्तु माने यांनी परंडा पो.ठा. अनैसर्गीक मृत्यु क्र. 07 / 2021 फौ.प्र.सं. कलम- 174 च्या चौकशीत 27 मार्च रोजी दिल्याने भा.दं.सं. कलम- 279, 304 (अ) सह मो.वा.का. कलम- 184, 134 (अ) (ब) अंतर्गत गुन्हा नोंदवला आहे

From around the web