उस्मानाबाद जिल्ह्यात दोन अल्पवयीन मुलीचे अपहरण 

 
उस्मानाबाद जिल्ह्यात दोन अल्पवयीन मुलीचे अपहरण

उस्मानाबाद - जिल्ह्यातल्या एका खेडेगावातील 16 वर्षीय मुलगी (नाव- गाव गोपनीय) 16 मार्च रोजी शेतात गेली असता गावातीलच 25 वर्षीय युवकाने तीचे मोटारसायकलद्वारे अपहरण केले आहे. अशा मजकूराच्या अपहृत मुलीच्या पित्याने 18 मार्च रोजी दिलेल्या प्रथम खबरेवरुन भा.दं.सं. कलम- 363 अंतर्गत गुन्हा नोंदवला आहे.

            दुसऱ्या घटनेत एक 15 वर्षीय मुलगी (नाव- गाव गोपनीय) 17 मार्च रोजी “मैत्रीनीच्या घरी पुस्तक देउन येते.” असे कुटूंबीयांना सांगुण घराबाहेर पडली होती. त्या नंतर ती घरी न परतल्याने गावातीच तरुणाने मोटारसाकयलवरुन तीचे अपहरण केल्याचे समजले. यावरुन अपहृत मुलीच्या आईने 18 मार्च रोजी दिलेल्या प्रथम खबरेवरुन भा.दं.सं. कलम- 363, 366 (अ) अंतर्गत गुन्हा नोंदवला आहे.

चोरी

येरमाळा: व्यापाऱ्यास विकलेल्या हरभऱ्याची 2,61,000 ₹ रक्कम घेउन विजय चंद्रकांत भोरे रा. सापनाई, ता. कळंब हे 18 मार्च रोजी 00.15 वा. सु पिकअप वाहन क्र. एम.एच. 25 पी 5514 मधून घरी परतत होते. दरम्यान सापनाई येथील दहिफळ रस्त्यावर एका पॅशन प्रो मोटारसायकलवर आलेल्या 3 अनोळखी पुरुषांनी नमूद पिकअप वाहन आडवून अंगावर थुकल्याचा बहाना करुन विजय भोरे व पिकअप चालक यांना गाडी बाहेर ओढून लोखंडी गजाचा धाक दाखवून विजय भोरे यांच्याजवळील नमूद रक्कम व चालकासह दोघांचे स्मार्टफोन हिसकावून पसार झाले. अशा मजकुराच्या विजय भोरे यांनी दिलेल्या प्रथमखबरेवरुन भा.दं.सं. कलम- 392, 341 अंतर्गत गुन्हा नोंदवला आहे.

अपघात

उस्मानाबाद : बिदर, राज्य- कर्नाटक येथील साईबन्ना चंदन्ना क्षिरसागर हे 18 मार्च रोजी 13.00 वा. सु. आयुर्वेदिक महाविद्यालय, उस्मानाबाद समोरील पुलावरुन स्विफ्ट कार के.ए. 38 एम 2062 ने जात होते. यावेळी चालक- स्वप्नील अनिल शिंदे, रा. उस्मानाबाद यांनी वाहन क्र. एम.एच. 25 एके 5599 ही निष्काळजीपणे चालवून साईबन्ना यांच्या कारला धडक दिली. त्याचा जाब साईबन्ना यांनी स्वप्नील शिंदे यांस विचारला असता स्वप्नील यांसह अन्य दोघांनी त्यांना शिवीगाळ करुन लाथाबुक्क्यांनी मारहाण केली. अशा मजकुराच्या साईबन्ना क्षिरसागर यांनी दिलेल्या प्रथम खबरेवरुन भा.दं.सं. कलम- 279, 323, 427, 504, 34 अंतर्गत गुन्हा नोंदवला आहे.

मारहाण

 शिराढोण : कल्याण त्र्यंबक पवार,ख्‍ रा. करंजकल्ला, ता. कळंब हे 15 मार्च रोजी 06.00 वा. सु. गावातील हनुमान मंदीराजवळ असतांना पुर्वीच्या भांडणाच्या कारणावरुन भाऊ- सुंदर त्र्यंबक पवार यांनी कल्याण पवार यांना शिवीगाळ करुन धक्काबुक्की केली व दगडाने मारहाण करुन जखमी केले. अशा मजकुराच्या कल्याण पवार यांनी 18 मार्च रोजी दिलेल्या प्रथम खबरेवरुन भा.दं.सं. कलम- 324, 323, 504, 506 अंतर्गत गुन्हा नोंदवला आहे.

 बेंबळी: रब्बानी अल्लाउद्दीन तांबोळी, रा. समुद्रवाणी, ता. उस्मानाबाद हे 17 मार्च रोजी 21.00 वा. सु. राहत्या घरा समोर असतांना भाऊ- चाँदपाशा तांबोळी यांनी त्यांना पैसे मागीतले. यावर रब्बानी यांनी नकार दिल्याने चाँदपाशा याने चिडून जाउन रब्बानी यांच्या गळ्यावर ब्लेडने वार करुन त्यांना जखमी केले. या प्रसंगी रब्बानी यांच्या बचावास त्यांची आई, पत्नी आले असता त्यांनाही चाँदपाशा याने धक्काबुक्की केली. अशा मजकुराच्या रब्बानी तांबोळी यांनी 18 मार्च रोजी दिलेल्या प्रथम खबरेवरुन भा.दं.सं. कलम- 326, 323 अंतर्गत गुन्हा नोंदवला आहे.

                                                                                  

From around the web