उस्मानाबाद जिल्ह्यात १७ माची रोजी हाणामारीच्या दोन घटना 

 

तुळजापूर: तुळजापूर येथील बालाजी गायकवाड, सागर मोटे, निलेश इंगळे अशा तीघांनी 16 मार्च रोजी 02.00 वा. सु. बोरी येथील ‘जम्मु ढाबा’ येथे जाउन तेथील कामगारांनी ढाब्यावर मद्य न पिउदिल्याच्या कारणावरुन कामगार- सुरेंद्र कुमार यांना शिवीगाळ करुन लोखंडी गजाने मारहाण करुन जखमी केले. तसेच ढाब्यावरील साहित्यांसह खिडकी तोडून नुकसान करुन, “तुम्ही ढाबा कसा चालवताय ते बघतो.” असे धमकावले. अशा मजकुराच्या ढाबा मालक- राजेश नागनाथ मस्के, रा. तुळजापूर यांनी दिलेल्या प्रथम खबरेवरुन भा.दं.सं. कलम- 324, 323, 504, 506, 427, 34 अंतर्गत गुन्हा नोंदवला आहे.

कळंब: फिरोज फारुक शेख, रा. इंदिरानगर, कळंब हे 15 मार्च रोजी 20.30 वा. सु. आपल्या राहत्या घरी असतांना पुर्वीच्या भांडणाच्या कारणावरुन गावकरी- समीर सय्यद व नुरजहा सय्यद या दोघांनी फिरोज शेख यांना शिवीगाळ करुन लाथाबुक्क्यांनी, हातातील कड्याने मारहाण करुन जखमी केले. अशा मजकुराच्या फिरोज शेख यांनी 16 मार्च रोजी दिलेल्या प्रथम खबरेवरुन भा.दं.सं. कलम- 324, 323, 504, 34 अंतर्गत गुन्हा नोंदवला आहे.

                                                                                  

अपघात

उमरगा: चालक- शिवाजी रामराव नागरसोगे, रा. कुन्हाळी, ता. उमरगा यांनी 15 मार्च रोजी 17.30 वा. सु. वागदरी येथील गुगळगाव- वागदरी रस्ता वळणावर मोटारसायकल क्र. एम.एच. 25 एयु 0967 ही निष्काळजीपणे चलवल्याने रस्त्याबाजूच्या कठड्यास धडकली. या अपघातात पाठीमागे बसलेले- दिगंबर सदाशिव बिराजदार, वय 40 वर्षे, रा. त्रिकोळी, ता. उमरगा हे गंभीर जखमी होउन मयत झाले. अशा मजकुराच्या मयताचा मुलगा- विष्णु बिराजदार यांनी 16 मार्च रोजी दिलेल्या प्रथम खबरेवरुन भा.दं.सं. कलम- 279, 337, 338, 304 (अ) सह मो.वा.का. कलम- 184 अंतर्गत गुन्हा नोंदवला आहे.

From around the web