उस्मानाबाद जिल्ह्यात हाणामारीच्या दोन घटना 

 
उस्मानाबाद जिल्ह्यात हाणामारीच्या दोन घटना

तामलवाडी: बालाजी विठठल डोलारे रा. गवळेवाडी ता. तुळजापुर हे 14 एप्रिल रोजी 17.30 वा. आपले घरासमोर होते.  यावेळी गावकरी-  अनिल डोलारे, ब्रम्हदेव साठे दोघे रा. गवळेवाडी यांनी मिळुन जागेच्या कारणावरुन बालाजी यांना शिवीगाळ करुन लाथाबुक्यांनी मारहाण केली व चाकुने मारुन जखमी केले. तसेच बालाजी यांचे वडीलास ठार मारण्याची धमकी दिली. अशा मजकुराच्या बालाजी यांनी दिलेल्या प्रथम खबरेवरुन भा. द. सं. कलम 324, 323, 504, 506, 34  अंतर्गत गुन्हा नोंदवला आहे.

 तामलवाडी: वामन खंडु साठे रा. गवळेवाडी ता. तुळजापुर हे 14 एप्रिल रोजी 17.30 वा. आपले घरासमोर होते.  यावेळी गावकरी-  बालाजी डोलारे, सागर डोलारे दोघे रा. गवळेवाडी यांनी मिळुन जागेच्या कारणावरुन वामन यांना शिवीगाळ करुन लाथाबुक्यांनी मारहाण केली व दगडाने मारुन जखमी केले. तसेच ठार मारण्याची धमकी दिली. अशा मजकुराच्या वामन यांनी दिलेल्या प्रथम खबरेवरुन भा. द. सं. कलम  324, 323, 504, 506, 34  अंतर्गत गुन्हा नोंदवला आहे.

अपघात

मुरुम: नरेंद्र हरी कोकाटे वय 39 वर्ष रा. दस्तापुर ता. लोहारा हे 13 एप्रिल रोजी 17.45 वा दाळींब येथे बस स्टॉपसमोर रोड का्रॅस करीत होते. यावेळी ट्रॅक्टर क्रमांक टी. एन. 45 बीई 2295 चा अज्ञात चालकाने ट्रॅक्टर हे रस्त्याचे परीस्थितीकडे दुलर्क्ष करुन निष्काळजीपणे  चालवुन नरेंद्र यांना धडक दिली. यात नरेंद्र हे गंभीर जखमी झाले. अशा मजकुराच्या मयताची पत्नी अंजना कोकाटे यांनी 14 एप्रिल रोजी दिलेल्या प्रथम खबरेवरुन भा. द. सं. कलम 279, 337, 338 मोवाका कलम  134 अ ब अंतर्गत गुन्हा नोंदवला आहे.

From around the web