उस्मानाबाद जिल्ह्यात चोरीच्या दोन घटना 

 
उस्मानाबाद जिल्ह्यात चोरीच्या दोन घटना

उस्मानाबाद : विलास अभिमान सुर्यवंशी, रा. सांजा, ता. उस्मानाबाद यांनी त्यांची हिरो होंडा स्प्लेंडर मोटारसायकल क्र. एम.एच. 25 एजी 0933 ही दि. 14.04.2021 रोजी 10.00 वा. सांजा येथील आपल्या शेतातील पत्रा शेडसमोर लावली होती. ती त्यांना 15.00 वा. लावल्या ठिकाणी न आढळल्याने अज्ञात व्यक्तीने ती चोरुन नेली आहे. अशा मजकुराच्या विलास सुर्यवंशी यांनी 25 एप्रील रोजी दिलेल्या प्रथम खबरेवरुन भा.दं.सं. कलम- 379 अंतर्गत गुन्हा नोंदवला आहे.

येरमाळा: आबासाहेब गजेंद्र रुमणे, रा. येरमाळा, ता. कळंब यांच्या दहिफळा गावातील देशी दारु दुकानाचे कुलूप अज्ञात व्यक्तीने 25 एप्रील रोजी मध्यरात्री तोडून दुकानातील देशी दारुचे 85 बॉक्स त्यातील एकुण 4,080 बाटल्या व दुकानातील सीसीटीव्ही चा डीव्हीआर असा एकुण 2,12,000 ₹ चा माल चोरुन नेला अशा मजकुराच्या आबासाहेब रुमणे यांनी दिलेल्या प्रथम खबरेवरुन भा.दं.सं. कलम- 380, 461 अंतर्गत गुन्हा नोंदवला आहे.

अपघात

 उस्मानाबाद -  रविंद्र नागनाथ शिंदे, वय 40 वर्षे, रा. येडशी, ता. उस्मानाबाद हे 25 एप्रील रोजी 01.00 वा. सु. येडशी येथील लकी ढाब्यासमोरील राष्ट्रीय माहामार्ग क्र. 52 वरुन पायी जात होते. यावेळी अज्ञात चालकाने वाहन निष्काळजीपणे चालवून रविंद्र शिंदे यांना पाठीमागून धडक दिल्याने ते गंभीर जखमी होउन मयत झाले. या अपघातानंतर अज्ञात वाहनाचा अज्ञात चालक अपघातस्थळावरुन वाहनासह पसार झाला. अशा मजकुराच्या मयताचा भाऊ- सचिन भिमा शिंदे, रा. येडशी यांनी दिलेल्या प्रथम खबरेवरुन भा.दं.सं. कलम- 279, 304 (अ) सह मो.वा.का. कलम- 184, 134 (अ) (ब) अंतर्गत गुन्हा नोंदवला आहे.

From around the web