उस्मानाबाद जिल्ह्यात चोरीच्या दोन घटना  

 
उस्मानाबाद जिल्ह्यात चोरीच्या दोन घटना

भुम : कैलास लोखंडे रा. ईट ता. भुम यांची  स्प्लेंडर मो. सा. क्र. एम. एच. 25 जे 3798 ही 09 एप्रिल रोजी दुपारी एस. बी. आय. बँक भुम समोरुन अज्ञाताने चोरुन नेली. अशा मजकुराच्या कैलास लोखंडे यांनी दि. 10 एप्रिल रोजी दिलेल्या प्रथम खबरेवरुन भा. द. सं. कलम 379 अंतर्गत गुन्हा नोंदवला आहे.

 
तामलवाडी : सागर डोलारे रा. सावरगाव ता. तुळजापुर यांची  रॉयल इनिफिल्ड मो. सा. क्र. एम. एच. 25 एजी 7469  ही 08 ते 09 एप्रिल दरम्यान त्यांचे राहते घरासमोरुन अज्ञाताने चोरुन नेली. अशा मजकुराच्या कैलास लोखंडे यांनी दि. 10 एप्रिल रोजी दिलेल्या प्रथम खबरेवरुन भा. द. सं. कलम 379 अंतर्गत गुन्हा नोंदवला आहे.

मनाई आदेशांचे उल्लंघन करणाऱ्यांवर पोलीसांतर्फे गुन्हा दाखल

तामलवाडी: गणेश भारत दळवी रा. मसला खुर्द ता. तुळजापुर यांनी 10 एप्रील रोजी 13.15 वा. कोवीड-19 संबंधीचे प्रशासनाचे मनाई आदेश झुगारुन मसला पाटी येथे हॉटेल व्यवसायास चालु ठेवुन भा. दं. सं.  कलम- 188, 269 चे उल्लंघन केले.

अवैध मद्य विरोधी कारवाई

 बेंबळी : अवैध मद्य विक्री होत असल्याच्या गोपनीय खबरेवरुन बेंबळी पोलीसांनी  10 एप्रील रोजी 16.30 वा. बामणीवाडी शिवारातील वैभव बिअर बार परमीट रुमचे पाठीमागे शेतात  छापा टाकला असता गणेश श्रीमंत कुंभार, रा. केशेगाव, हे अवैध विक्रीच्या उद्देशाने इंम्पेरीयल ब्ल्यु कंपनीच्या 180 मि. ली. च्या  28 दारुच्या बाटल्या, जवळ बाळगला असतांना आढळला.

अपघात

 ढोकी : अफरोज बागवान, रा. लातुर ह. मु. पुणे हे आपले आई-वडीलांसह 9 एप्रिल रोजी 13.30 वा. पुणे येथे कार क्र. एम. एच. 09 एक्यु 4111 ने जात होते. यावेळी ते एरंडवाडी पाटीजवळ आले असतांना ट्रक क्र. एम. एच. 48 टी 5180 हे चे चालकाने आपले वाहन निष्काळजीपणे चालवुन बागवान यांच्या कारला धडक दिली. या अपघातात गफर बागवान हे मयत झाले. अशा मजकुराच्या अफरोज बागवान यांनी दिलेल्या प्रथम खबरेवरुन भा. द. सं. कलम 279, 337, 338, 304 अ आणि मो. वा. का. कलम 184, 134 अ ब अंतर्गत गुन्हा नोंदवला आहे.

                                                                                  

From around the web