उस्मानाबाद जिल्ह्यात चोरीच्या दोन घटना 

 

लोहारा: भातागळी, ता. लोहारा येथील तानाजी आनंदगावकर यांच्या गावातील किराणादुकानचे कुलूप गावकरी- ईश्वर राजेंद्र फत्तेपुरे यांनी 30- 31 मार्च दरम्यानच्या रात्री तोडून आतील किरकोळ किराणा साहित्य व 5,160 ₹ रक्कम चोरुन नेली. अशा मजकुराच्या तानाजी आनंदगावकर यांनी दिलेल्या प्रथम खबरेवरुन भा.दं.सं. कलम- 457, 380 अंतर्गत गुन्हा नोंदवला आहे.

वाशी: शरीफ दादामियाँ शिखलकर, रा. इंदापुर, ता. वाशी यांनी आपली हिरो डिलक्स मोटारसायकल क्र. एम.एच. 25 एयु 0332 ही 26 मार्च रोजी 22.00 वा. सु. राहत्या घरासमोर ठेवली होती. ती दुसऱ्या दिवशी सकाळी ठेवल्या जागी न आढळल्याने ती अज्ञाताने चोरली असावी. अशा मजकुराच्या शरीफ शिखलकर यांनी 31 मार्च रोजी दिलेल्या प्रथम खबरेवरुन भा.दं.सं. कलम- 379 अंतर्गत गुन्हा नोंदवला आहे.

घरफोडीतील रकमेसह अल्पवयीन ताब्यात

लोहारा पो.ठा. येथे दाखल असलेल्या घरफोडीच्या गुन्ह्याच्या तपासादरम्यान स्था.गु.शा. च्या पथकाने एका विधीसंघर्षग्रस्त बालकास (अल्पवीन) आज दि. 01 एप्रील रोजी लोहारा तालुक्यातून ताब्यात घेउन नमूद घरफोडीतील 5,100 ₹ रक्कम त्याच्या ताब्यातून जप्त केली आहे.

From around the web