उस्मानाबाद जिल्ह्यात हाणामारीचे दोन गुन्हे दाखल 

 
उस्मानाबाद जिल्ह्यात हाणामारीचे दोन गुन्हे दाखल

परंडा: गौतम पांडुरंग काळे, रा. वांगी (बु), ता. भुम हे  18 एप्रिल रोजी 17.30 वाजता पत्नीसह शेतात होते. यावेळी गावकरी- शिवाजी, गंगराम, रुक्मीन, रामहरी शेळके, यांनी गौतम यांच्या शेतात कडब्याची गंज लावत होते. यावेळी गौतम यांची पत्नी-सिताबाई यांनी त्यांना गंज आमचे शेतात लावु नका असे म्हणाल्या असता शिवाजी, गंगराम, रुक्मीन, रामहरी शेळके, यांनी मिळुन शिवीगाळ करुन लाथाबुक्याने व लाकडी खिळीने, कु-हाडीने मारुन जखमी केले. तसेच ठार मारण्याची धमकी दिली. अशा मजकुराच्या गौतम काळे यांनी दिलेल्या प्रथम खबरेवरुन भा. दं. सं. कलम- 326, 324, 323, 504, 506, 34 अंतर्गत गुन्हा नोंदवला आहे.

 नळदुर्ग: समाधान तानाजी ढोले, रा. येवती ता. तुळजापुर हे 19 एप्रिल रोजी 20.00 वाजता आपले हॉटेल समोर होते. यावेळी गावकरी- वैजिनाथ विनायक गवळी, यांनी समधान यांना तु हॉटेल का उघडत नाहीस असे म्हणुन शिवीगाळ करुन लाथाबफक्याने मारहाण केली. दाताने चावा घेउन जखमी केले. तसेच ठार मारण्याची धमकी दिली.  अशा मजकुराच्या समाधान ढोले यांनी दिलेल्या प्रथम खबरेवरुन भा. दं. सं. कलम- 324, 323, 504, 506 अंतर्गत गुन्हा नोंदवला आहे.

चोरी

उस्मानाबाद -  भारत विश्वनाथ गेंड, रा. गुंजेवाडी ता. उस्मानाबाद हे 20 एप्रिल रोजी 11.00 वा. मो. सा. वर फिरुन समर्थ नगर, उस्मानाबाद येथे आंबे विक्री करत होते. दरम्यान मो. सा. च्या हँन्डलला लावलेली पिशवीतील रोख 47,000 ₹ पिशवीसह अज्ञाताने चोरुन नेले. अशा मजकुराच्या भारत यांनी दिलेल्या प्रथम खबरेवरुन भा. दं. सं. कलम- 379 अंतर्गत गुन्हा नोंदवला आहे.

                                                                                  

From around the web