उस्मानाबाद जिल्ह्यात हाणामारीचे दोन गुन्हे दाखल 

 

उमरगा : मल्लीनाथ स्वामी , रा. उमरगा  हे 04 एप्रिल रोजी उमरगा शिवारातील बिरुदेव मंदीराजवळील शेतात आपल्या मुलासह ट्रक्टरने नांगरणी करत होते. या वेळी शेतशेजारी सुरवसे कुटुंबातील राम व लक्ष्मण या दोघा भावांसह यशवंता, देवीदास यांनी ट्रक्टर आडवुन नांगरणीच्या वादातुन माल्लीनाथ यांसह त्याच्या मुलास शिवीगाळ करुन लाथाबुक्यांनी मारहाण  करुन ठार मारण्याची धमकी दिली. तसेच शेतातील वैरणीचे नूकसान केले. अशा मजकुराच्या प्रथम खबरेवरुन भा.दं.सं. कलम- 341,427,323,504,506,34 अंतर्गत गुन्हा नोंदवला आहे.


 नळदुर्ग : भिमराव शेगर रा. येडोळा ता. तुळजापुर  हे 04 एप्रिल रोजी 20.00 वा. आपल्या घरासमोर होते. यावेळी बालकांच्या भांडण्याच्या वादातुन भाऊबंद प्रकाश, आनंद, माऊली, करण, यांनी भिमराव यांना शिवीगाळ करुन लाथाबुक्यांनी व काठीने मारहाण  करुन ठार मारण्याची धमकी दिली. अशा मजकुराच्या प्रथम खबरेवरुन भा.दं.सं. कलम-324,323,504,506,34 अंतर्गत गुन्हा नोंदवला आहे.

लैंगिक छळ

उस्मानाबाद जिल्हयातील एका गावातील एक 23 वर्षीय विवाहित महिला 1 एप्रिल रोजी दुपारी घरात झोपली असल्याची संधी साधुन गावातीलच एका तरुणाने तिच्या घरात घुसुन तिच्याशी  झोंबाझोंबी करुन तिचा विनयभंग केला. तसेच घडला प्रकाराची वाच्यता केल्यास  तुझ्या  नव-याला ठार मारेल  अशी धमकी देवुन तिला मारहाण केली. अशा मजकुराच्या संबंधित महिलेने  04 एप्रील रोजी दिलेल्या प्रथम खबरेवरुन भा.दं.सं. कलम- 354, 323,504,506 अंतर्गत गुन्हा नोंदवला आहे.


जिल्ह्यात दोन अपघात 

 उमरगा : जफर फतरु शेख, रा. बेट जवळगा, ता. उमरगा  हे दि. 19.03.2021 रोजी 18.00 वा. सु. बेट जवळगा शिवारातील  रस्त्याने पायी जात होते.या वेळी अज्ञात चालकाने मोटारसायकल क्र. एम.एच. 25 ए.एच. 2217 ही  निष्काळजीपणे चालवून जफर शेख यांना  धडक दिल्याने ते गंभीर जखमी होवुन मयत झाले.

अशा मजकुराच्या कासिम फतरु शेख यांनी 04 एप्रील रोजी दिलेल्या प्रथम खबरेवरुन भा.दं.सं. कलम- 279, 304 अ, सह मो.वा.का. कलम- 134, 184 अंतर्गत गुन्हा नोंदवला आहे.

तुळजापुर : पिकअप चालक-नागेश देवरे रा.ठाणे यांनी 02 एप्रिल रोजी तडवळा शिवारात तुळजापुर- लातुर  महामागार्वर पिकअप वाहन क्रं एम.एच.05 डी.के. 5971 ही निष्काळजीपणे चालवुन महिंद्रा एक्सयुव्हि कार क्रं के.ए. 03 एन.डी. 5385 व क्रेटा वाहन क्र. एम.एच. 24 ए.एफ. 5808 ला धडक दिली. या अपघातात एक्सयुव्हि कारमधील  दोघे प्रवासी गंभीर जखमी होवुन तीनही वाहनांचे नुकसान झाले. अशा मजकुराच्या  शकील नजीर शेख रा. सुंभा ता.उस्मानाबाद यांनी 04 एप्रील रोजी दिलेल्या प्रथम खबरेवरुन भा.दं.सं. कलम- 279, 427,337,338 अंतर्गत गुन्हा नोंदवला आहे.

                                                        

तुगावमध्ये चोरी 

 ढोकी: प्रकाश शेंडगे, रा. तुगाव, ता.उस्मानाबाद यांची घरासमोरील होंडा शाईन मोटारसायकल क्र. एम.एच. 25 ए.एच. 2859 ही 2 ते 3 एप्रिल दरम्यानच्या रात्री  अज्ञाताने चोरुन नेली. अशा मजकुराच्या प्रथम खबरेवरुन भा.दं.सं. कलम- 379 अंतर्गत गुन्हा नोंदवला आहे.

From around the web