उस्मानाबाद जिल्ह्यात हाणामारीचे दोन गुन्हे दाखल 

 

 परंडा - पुर्वीच्या भांडणाच्या कारणावरुन कौडगाव, ता. परंडा येथील ठवरे कुटूंबातील वंदना, विष्णु, पद्मीन, नाना यांसह शोभा व सुरज चोरमले, जनाबाई फुलगुडे, रा. काटेवाडी यांच्या गटाचा गावकरी- वायकुळे कुटूंबातील राजश्री, सुनिल, भैरु, आश्विनी यांसह ठवरे कुटूंबातील भैरु, किरण, मंगलबाई यांच्या गटाशी 31 मार्च रोजी 18.00 वा. सु. कौडगाव येथे वाद झाला. या वादाचे पर्यावसान हानामारीत होउन दोन्ही गटांतील व्यक्तींनी परस्पर विरोधी गटांतील व्यक्तींस शिवीगाळ करुन लाथाबुक्क्यांनी, वायर, पट्टा, काठीने मारहाण करुन जखमी केले व ठार मारण्याची धमकी दिली. अशा मजकुराच्या वंदना ठवरे व राजश्री वायकुळे यांनी परस्परविरोधी दिलेल्या 2 प्रथम खबरेवरुन भा.दं.सं. कलम- 324, 323, 504, 506, 143, 147, 148, 149 कायद्यांतर्गत गुन्हे नोंदवले आहेत.

उस्मानाबाद - देवळाली, ता. उस्मानाबाद येथील नितीन महादेव कांबळे हे दि. 29.03.2021 रोजी गावातील बसथांब्याजवळ असतांना गावकरी- बापु सुरवसे, बालाजी कडके, सुजित देशमाने या तीघांनी, “तु परवा आमच्या गाडीला हुलकावणी का दिलीस.” अशी कुरापत काढून नितीन कांबळे यांना शिवीगाळ करुन लोखंडी गज, काठीने मारहाण करुन जखमी केले. नितीन कांबळे यांच्या बचावास आलेला त्यांचा भाऊ- सचिन कांबळे यांसही मारहाण केली. अशा मजकुराच्या नितीन कांबळे यांनी वैद्यकीय उपचारादरम्यान दिलेल्या लेखी निवेदनावरुन भा.दं.सं. कलम- 324, 323, 504, 506, 34 सह ॲट्रॉसिटी कायद्यांतर्गत गुन्हा नोंदवला आहे.


अपघात 

उमरगा: चालक- सुनिल शिवाप्पा तानवडे, रा. चिंचोली (ज.), ता. उमरगा यांनी दि. 09.03.2021 रोजी 18.00 वा. सु. गुंजोटी- उमरगा रस्त्यावर मोटारसायकल क्र. एम.एच. 25 एबी 9514 ही निष्काळजीपणे चालवून रस्त्याने पायी जाणारे- वामन विठ्ठल लोकरे, वय 45 वर्षे, रा. गुंजोटी, ता. उमरगा यांना पाठीमागून धडक दिली. या अपघातात वामन लोकरे हे गंभीर जखमी होउन मयत झाले. अशा मजकुराच्या मयताचा मुलगा- शैलेश लोकरे यांनी 01 एप्रील रोजी दिलेल्या प्रथम खबरेवरुन भा.दं.सं. कलम- 279, 338, 304 (अ) सह मो.वा.का. कलम- 184 अंतर्गत गुन्हा नोंदवला आहे.

 नळदुर्ग: देवसिंगा (नळ), ता. तुळजापूर येथील रुपलाबाई भिकू पवार, वय 50 वर्षे, यांसह त्यांचा मुलगा- देविदास असे दोघे दि. 31.01.2021 रोजी 13.00 वा. सु. तुळजापूर- देवसिंगा (नळ) असा मोटारसायकल क्र. एम.एच. 25 एक्स 2681 ने प्रवास करत होते. दरम्यान काळेगाव शिवारातील रस्त्यावर अज्ञात चारचाकी वाहनाने त्यांच्या मो.सा. ला पाठीमागून धडक दिली. या अपघातात रुपलाबाई या गंभीर जखमी होउन मयत झाल्या. अशा मजकुराच्या देविदास पवार यांनी 01 एप्रील रोजी दिलेल्या प्रथम खबरेवरुन भा.दं.सं. कलम- 279, 304 (अ) अंतर्गत गुन्हा नोंदवला आहे.

From around the web