उस्मानाबाद जिल्ह्यात हाणामारीचे दोन गुन्हे दाखल 

 

परंडा: अंदोरा, ता. परंडा येथील नितीन लिंबराज शिंदे हे 13 मार्च रोजी 09.00 वा. सु. गावातील तालमीच्या कट्ट्यावर बसले असतांना पुर्वीच्या वादावरुन गावकरी- अमोल सुरेश गोफणे यांनी नितीन शिंदे यांना शिवीगाळ करुन ठार मारण्याची धमकी देउन काठीने मारहाण करुन त्यांना जखमी केले. अशा मजकुराच्या नितीन शिंदे यांनी दिलेल्या प्रथम खबरेवरुन भा.दं.सं. कलम- 324, 323, 504, 506 अंतर्गत गुन्हा नोंदवला आहे.

 
 दुसऱ्या घटनेत चिंचपुर, ता. परंडा येथील सिध्दार्थ गजरमल हे 12 मार्च रोजी 17.00 वा. जामगाव शिवारातील आपल्या शेतात असतांना खानापुर, ता. परंडा येथील बळीराम, भाग्यवंत, शारदा परिहार यांनी तेथे येउन सिध्दार्थ यांना शिवीगाळ करुन ठार मारण्याची धमकी देउन त्यांच्या पिकाचे नुकसान केले. अशा मजकुराच्या सिध्दार्थ गजरमल यांनी 13 मार्च रोजी दिलेल्या प्रथम खबरेवरुन भा.दं.सं. कलम- 447, 427, 504, 506, 34 अंतर्गत गुन्हा नोंदवला आहे.

विनयभंग

उस्मानाबाद : उस्मानाबाद जिल्ह्यातील एक 16 वर्षीय मुलगी (नाव- गाव गोपनीय) 13 मार्च रोजी 10.00 आपल्या घरात असतांना मुंबई येथील एका युवकाने तीच्याशी झोंबाझोंबी करुन तीच्या अंगावरील कपडे फाडण्याचा प्रयत्न करुन तीच्या अंगावर ॲसीड फेकले असता त्या मुलीने पलायन करुन ॲसीड हल्ला चुकवला. अशा मजकुराच्या संबंधीत मुलीने दिलेल्या प्रथम खबरेवरुन भा.दं.सं. कलम- 326 (ब), 354, 452 सह पोक्सो कायदा कलम- 8, 12 अंतर्गत गुन्हा नोंदवला आहे.

                                                                                   

From around the web