तुळजापुरात चोरीच्या दागिन्यांसह दोन आरोपी ताब्यात

 

तुळजापूर: सरडेवाडी, ता. तुळजापूर येथील ज्ञानेश्वर मच्छिंद्र धुरगुडे हे सहपत्नीक 04 मार्च रोजी 12.30 वा. सु. डॉ. आंबेडकर चौक, तुळजापूर येथील प्रकाश फुटवेअर दुकानासमोर आपली मोटारसायकल लावून खरेदीसाठी गेले होते. मो.सा. ला अडकवलेल्या पर्स मधील 11 ग्रॅम सोन्याचे दागिने, 5 भार चांदीचे पैंजन असा माल असलेली पर्स अज्ञाताने चोरुन नेली. यावरुन तुळजापूर पो.ठा. येथे गु.र.क्र. 75 / 2021 हा भा.दं.सं. कलम- 379, 34 प्रमाणे दाखल आहे.

            गुन्हा तपासात तुळजापूर पो.ठा. चे पोनि- श्री मनोजकुमार राठोड, पोहेकॉ- राठोड, पोकॉ- माळी यांच्या पथकाने मिळालेल्या गोपनीय माहितीच्या आधारे नमूद चोरीच्या मालासह आरोपी- 1)गणेश बोरकर, वय 28 वर्षे 2)विजय भगवान बोराडे, 20 वर्षे, दोघे रा. मातंगनगर, तुळजापूर यांना आज 11 मार्च रोजी ताब्यात घेउन चोरी करण्यास वापरलेली हिरो स्प्लेंडर प्लस मो.सा. क्र. एम.एच. 37 एच 3472 ही जप्त केली. जप्त केलेल्या मो.सा. बाबत पोलीसांनी खात्री केली असता सदर मो.सा. चोरीस गेल्यावरुन वाशिम जिल्ह्यातील रिसोड पो.ठा. येथे गु.र.क्र. 107 / 2021 हा भा.दं.सं. कलम- 379 प्रमाणे दाखल आहे. अशा प्रकारे तुळजापूर पोलीसांनी स्वत:चा गुन्हा उघडकीस आणलाच त्यासोबत वाशिम जिल्ह्यातील मोटारसायकल चोरीचाही गुन्हा उघडकीस आणला आहे.

सार्वजनिक ठिकाणी निष्काळजीपणे वाहन उभे करणाऱ्या चालकावर गुन्हा दाखल

ढोकी: कौडगाव (बावी), ता. उस्मानाबाद येथील आकाश रंजीत कदम यांनी 10 मार्च रोजी पिकअप वाहन क्र. एम.एच. 25 एजे 7370 हा ढोकी येथे लातुर जाणाऱ्या रस्त्यावर वाहतुकीस कोंडी व मानवी जिवीतास धोका निर्माण होईल अशा धोकादायक अवस्थेत उभा केला. यावरुन ढोकी पो.ठा. चे पोकॉ- अमोल गोडगे यांनी सरकारतर्फे दिलेल्या प्रथम खबरेवरुन भा.दं.सं. कलम- 283 अंतर्गत गुन्हा नोंदवला आहे.


शेतातील हरभऱ्याची गंजी जाळून नुकसान करणाऱ्या अज्ञातावर गुन्हा दाखल

कळंब: आंदोरा, ता. कळंब येथील विकास अंकुश पवार यांच्या आंदोरा शेत गट क्र. 548 मधील हरभरा पिकाच्या गंजीस 09 मार्च रोजी 06.25 वा. सु. अज्ञाताने जाणीवपुर्वक आगलावून विकास पवार यांचे अंदाजे 40,000 ₹ चे नुकसान केले. अशा मजकुराच्या विकास पवार यांनी दिलेल्या प्रथम खबरेवरुन भा.दं.सं. कलम- 435 अंतर्गत गुन्हा नोंदवला आहे.

From around the web