दोन अपघात, दोन ठार , एक जखमी 

 
Osmanabad police

 तुळजापूर: संतोष गणपती माळी, वय 38 वर्षे, रा. सावरगाव, ता. तुळजापूर हे दि. 07 जून रोजी 16.00 वा. सु. सांगवी मार्डी शिवारातील उजणी धरनाचे कॅनलवर ब्लास्टींगचे काम करत होते. दरम्यान लावलेले स्फोटक न फुटल्याने संतोष माळी हे ते पाहण्यासाठी निष्काळजीपणाने स्फोटक लावलेल्या ठिकाणी गेले असता अचानक स्फोट होउन त्यांना दगड लागल्याने ते गंभीर जखमी होउन मयत झाले. अशा मजकुराच्या मयताची आई- द्रोपती गणपती माळी यांनी दि. 08 जून रोजी दिलेल्या प्रथम खबरेवरुन मयत- संतोष माळी यांच्याविरुध्द भा.दं.सं. कलम- 286, 304 (अ) अंतर्गत गुन्हा नोंदवला आहे.

 मुरुम: दत्तात्रय लिंबाजी पवार, रा. जळकोट, ता. तुळजापूर हे दि. 15.05.2021 रोजी 08.45 वा. सु. मुलगा- ज्ञानेश्वर पवार यांसह कोळनुर पांढरी फाटा येथील राष्ट्रीय महामार्ग क्र. 65 च्या कडेला थांबले होते. यावेळी अज्ञात चालकाने मोटारसायकल क्र. एम.एच. 14 एचएफ 7213 ही निष्काळजीपणे चालवून नमूद पवार पिता- पुत्रांना धडक दिली. या अपघातात 50 वर्षीय दत्तात्रय पवार हे मयत झाले तर नमूद मो.सा. वर पाठीमागे बसलेले राम देवकर, रा. आष्टाकासार, ता. लोहारा हे गंभीर जखमी झाले. अपघातानंतर नमूद मो.सा. चा अज्ञात चालक वाहनासह अपघातस्थळावरुन पसार झाला. अशा मजकुराच्या ज्ञानेश्वर दत्तात्रय पवार यांनी दि. 08 जून रोजी दिलेल्या प्रथम खबरेवरुन भा.दं.सं. कलम- 279, 337, 338, 304 (अ) सह मो.वा.का. कलम- 134 (अ) (ब), 184 अंतर्गत गुन्हा नोंदवला आहे.

From around the web