उस्मानाबाद जिल्ह्यात दोन अपघात, एक ठार, दोन जखमी 

 

ढोकी: पंडीत कर्ला कोळी, रा. दत्तनगर, ढोकी, ता. उस्मानाबाद हे दि. 05.02.2021 रोजी 21.00 वा. सु. ढोकी येथील कळंब रस्त्याने पायी जात होते. यावेळी चालक- परशुराम अंकुश चौरे, रा. देवळाली यांनी मोटारसायकल निष्काळजीपणे चालवून पंडीत कोळी यांना पाठीमागून धडक दिल्याने ते गंभीर जखमी होउन वैद्यकीय उपचारादरम्यान मयत झाले. या अपघातानंतर नमूद चालक अपघातस्थळावरुन मोटारसायकलसह पसार झाला. अशा मजकुराच्या मयताचा पुतण्या- राम अनिल कोळी यांनी 30 मार्च रोजी दिलेल्या प्रथम खबरेवरुन भा.दं.सं. कलम- 279, 304 (अ) सह मो.वा.का. कलम- 184, 134 (अ) (ब) अंतर्गत गुन्हा नोंदवला आहे.

उस्मानाबाद -  अज्ञात चालकाने 29 मार्च रोजी 14.00 वा. सु. शहरातील गपाट रुग्णालय समोरील रस्त्यावर मोटारसायकल क्र. मए.एच. 25 एव्ही 1595 ही निष्काळजीपणे, हयगईने चालवून रस्ता ओलांडणाऱ्या मो.सा. क्र. एम.एच. 25 एएम 4777 ला डाब्या बाजूने धडक दिली. या अपघातात मो.सा. क्र. एम.एच. 25 एएम 4777 चे चालक- सुशांत जाधव, रा. सांजा रोड, उस्मानाबाद यांसह पाठीमागील प्रताप शेंडगे हे जखमी झाले. अशा मजकुराच्या सुशांत जाधव यांनी वैद्यकीय उपचारादरम्यान दिलेल्या प्रथम खबरेवरुन भा.दं.सं. कलम- 279, 337 सह मो.वा.का. कलम- 184 अंतर्गत गुन्हा नोंदवला आहे.

From around the web