उस्मानाबाद जिल्ह्यात दोन अपघात, एक ठार, तीन जखमी 

 

उमरगा: दौलत सुरेश गिरी व महादेव शिवाप्पा व्हरटे, दोघे रा. आष्टा कासार, ता. लोहारा हे दि. 17.02.2021 रोजी 12.30 वा. सु. उमरगा- गुंजोटी रस्त्यावर स्कुटरने प्रवास करत होते. यावेळी अज्ञात चालकाने ॲपे मॅजीक क्र. एम.एच. 25 एजे 1189 हा निष्काळजीपणे चालवून दौलत गिरी चालवत असलेल्या स्कुटरला समोरुन धडक दिली. या अपघातात दौलत गिरी व पाठीमागे बसलेले महादेव व्हरटे हे दोघे गंभीर जखमी झाले. अपघातानंतर ॲपे मॅजीकचा अज्ञात चालक अपघातस्थळावरुन वाहनासह पसार झाला. अशा मजकुराच्या दौलत गिरी यांनी 31 मार्च रोजी दिलेल्या प्रथम खबरेवरुन भा.दं.सं. कलम- 279, 337, 338 सह मो.वा.का. कलम- 184, 134 (अ) (ब) अंतर्गत गुन्हा नोंदवला आहे.

 नळदुर्ग: कृष्णकांत सुभाष निंबाळकर, वय 48 वर्षे, व दिपक कांबळे, दोघे रा. सुंदरमनगर, सोलापूर हे दोघे 18 मार्च रोजी 16.00 वा. सु. गोलाई चौक, नळदुर्ग येथील रस्त्याने मोटारसायकल क्र. एम.एच. 13 पी 6655 ने प्रवास करत होते. यावेळी अज्ञाताने मो.सा. क्र. एम.एच. 13 सीडब्ल्यु 8345 ही निष्काळजीपणे चालवून कृष्‌णकांत यांच्या मो.सा. ला पाठीमागुन धडक दिली. या अपघातात कृष्णकांत हे गंभीर जखमी होउन मयत झाले. अपघातानंतर अज्ञात वाहन चालक अपघातस्थळावरुन वाहनासह पसार झाला. अशा मजकुराच्या मयताचा भाऊ- प्रशांत यांनी 31 मार्च रोजी दिलेल्या प्रथम खबरेवरुन भा.दं.सं. कलम- 279, 337, 338, 304 (अ) सह मो.वा.का. कलम- 184, 134 (अ) (ब) अंतर्गत गुन्हा नोंदवला आहे.

From around the web