उस्मानाबाद जिल्ह्यात दोन अपघात, पाच जखमी 

 
Osmanabad police


तामलवाडी: अजित रमेश फंड, रा. जळकोटवाडी, ता. तुळजापूर व त्यांचा भाऊ- दिपक वैजीनाथ फंड असे दोघे दि. 03.06.2021 रोजी 15.30 वा. सु. सावरगाव रस्त्यावरील गंजेवाडी फाटा येथील रस्त्याने मोटारसायकलने प्रवास करत होते. दरम्यान अज्ञात चालकाने कार क्र. एम.एच. 04 डीवाय 9089 ही निष्काळजीपणे चालवून अजित फंड चालवत असलेल्या मो.सा. ला पाठीमागून धडक दिली. या अपघातात अजित फंड हे किरकोळ जखमी झाले तर पाठीमागे बसलेले दिपक फंड हे गंभीर जखमी झाले. या अपघातानंतर नमूद कारचा अज्ञात चालक अपघातस्थळावरून कारसह पसार झाला. अशा मजकुराच्या अजित फंड यांनी दि. 04 जून रोजी दिलेल्या प्रथम खबरेवरुन भा.दं.सं. कलम- 279, 337, 338 सह मो.वा.का. कलम- 184, 134 (अ)(ब) अंतर्गत गुन्हा नोंदवला आहे.

वाशी: अविनाश दत्तात्रय कोळी, रा. पार्डी, ता. वाशी हे दि. 03.06.2021 रोजी 12.00 वा. सु. गोलेगाव शिवारातील चौधरी पेट्रोलियम केंद्राजवळील रस्त्याने मिनीट्रक क्र. एम.एच. 04 ईवाय 9168 ने विट वाहतूक करत होते. दरम्यान चालक- उध्दव ज्ञानदेव कारगुडे, रा. पाली, जि. बीड यांनी ट्रक क्र. एम.एच. 12 एचडी 3611 हा निष्काळजीपणे चालवून नमूद मिनीट्रकला डाव्या बाजूने धडक दिल्याने मिनीट्रक पलटला. या अपघातात मिनीट्रक मकधील आकाश सपकाळ हे मयत झाले तर अविनाश कोळी यांसह संतोष मस्के, बाळु मस्के हे तीघे गंभीर जखमी झाले. अशा मजकुराच्या अविनाश कोळी यांनी दि. 04 जून रोजी दिलेल्या प्रथम खबरेवरुन भा.दं.सं. कलम- 279, 337, 338, 304 (अ) सह मो.वा.का. कलम- 184 अंतर्गत गुन्हा नोंदवला आहे.

From around the web