उस्मानाबाद जिल्ह्यात तीन अपघातात तीन ठार 

 
उस्मानाबाद जिल्ह्यात तीन अपघातात तीन ठार

तुळजापूर: प्रदिप सुखदेव चव्हाण, रा. उस्मानाबाद हे 25 मार्च रोजी 13.00 वा. सु. वडगाव (लाख) शिवारातील रस्त्याने मोटारसायकल क्र. एम.एच. 25 एयु 0580 ही चालवत होते. दरम्यान त्यांनी अचनक ब्रेक दाबल्याने पाठीमागे बसलेले रामकिसन भारत घायाळ, वय 40 वर्षे, रा. वडगाव (सि.) हे खाली पडल्याने त्यांच्या डोक्यास गंभीर दुखापत होउन मयत झाले. अशा मजकुराच्या श्रीराम सिद्राम घायाळ, रा. सिध्देश्वर (सि.) यांनी 29 मार्च रोजी दिलेल्या प्रथम खबरेवरुन भा.दं.सं. कलम- 279, 304 (अ) सह मो.वा.का. कलम- 184 अंतर्गत गुन्हा नोंदवला आहे.


नळदुर्ग: हिप्परगा (ताड), ता. तुळजापूर येथील अरुण रमेश दळवे व विशाल दत्तात्रय वाघमारे, वय 28 वर्षे हे दोघे दि. 11.02.2021 रोजी 22.30 वा. सु. हिप्परगा (ताड)- काळेगाव रस्त्याने विनानोंदणीक्रमांकाच्या मोटारसायकलने प्रवास करत होते. यावेळी अरुण दळवे यांनी मो.सा. निष्काळजीपणे, हयगईने चालवल्याने रस्त्याबाजूच्या दगडास धडकली. या अपघातात पाठीमागे बसलेले विशाल वाघमारे हे गंभीर जखमी झाल्याने वैद्यकीय उपचारादरम्यान मयत झाले. अपघातानंतर अरुण दळवे हे मो.सा. सह अपघातस्थळावरुन पसार झाले. अशा मजकुराच्या मयताची पत्नी- दिपाली विशाल वाघमारे यांनी 29 मार्च रोजी दिलेल्या प्रथम खबरेवरुन भा.दं.सं. कलम- 279, 304 (अ) सह मो.वा.का. कलम- 134 (अ) (ब) अंतर्गत गुन्हा नोंदवला आहे.

            दुसऱ्या घटनेत चालक- शंकर अंकुश बनसोडे, रा. लोहगाव, ता. तुळजापूर यांनी दि. 19.02.2021 रोजी 20.00 वा. सु. लोहगाव येथील रस्त्यावर वाहन क्र. एम.एच. 13 बीएन 0994 हे निष्काळजीपणे पाठीमागे घेउन पाठीमागे उभे असेले बळी खंडू बनसोडे, वय 75 वर्षे, यांना धडक दिली. या अपघातात बळी बनसोडे हे गंभीर जखमी होउन वैद्यकीय उपचारादरम्यान मयत झाले. अशा मजकुराच्या कालीदास राजेंद्र सोनटक्के, रा. लोहगाव यांनी दि. 29 मार्च रोजी अनैसर्गीक मृत्यु क्र. 25 / 2021 फौ.प्र.सं. कलम- 174 च्या चौकशीदरम्यान दिलेल्या लेखी निवेदनावरून भा.दं.सं. कलम- 279, 337, 338, 304 (अ) अंतर्गत गुन्हा नोंदवला आहे.

From around the web