उस्मानाबाद जिल्ह्यात दोन अपघातात तीन जखमी 

 
Osmanabad police

उस्मानाबाद : शेखर रावसाहेब पाटील, रा. लोहारा (खु.), ता. लोहारा हे दि. 01 जून रोजी 12.05 वा. सु. उस्मानाबाद येथील न्यायालयासमोरील रस्त्याने मोटारसायकल क्र. एम.एच. 25 सी 254 ने प्रवास करत होते. दरम्यान अज्ञात चालकाने मो.सा. क्र. एम.एच. 25 एएफ 8418 ही निष्काळजीपणे चालवून शेखर पाटील यांच्या मो.सा. ला पाठीमागुन धडक दिल्याने शेखर पाटील हे गंभीर जखमी झाले. 

या अपघातानंतर नमूद मो.सा. चा अज्ञात चालक जखमीस वैद्यकीय उपचारास न नेता व अपघाताची खबर नजीकच्या पोलीस ठाण्यास न देता अपघातस्थळावरुन मो.सा. सह पसार झाला. अशा मजकुराच्या शेखर पाटील यांनी वैद्यकीय उपचारादरम्यान दिलेल्या लेखी निवेदनावरुन भा.दं.सं. कलम- 279, 337, 338 सह मो.वा.का. कलम- 134 (अ) (ब) अंतर्गत गुन्हा नोंदवला आहे.

येरमाळा: विजय महादेव पांढरे, रा. उपळाई, ता. कळंब हे दि. 01 जून रोजी 02.30 वा. सु. तेरखेडा येथील रस्त्याने ट्रॅक्टर- ट्रॉली चालवत जात होते. दरम्यान अज्ञात चालकाने ट्रक क्र. एन.एल. 01 एन 0317 हा निष्काळजीपणे चालवून विजय पांढरे यांच्या ट्रॅक्टर- ट्रॉलीस पाठीमागून धडक दिल्याने ट्रॉली पलटली व नमूद ट्रकने पुढे जाउन समोरील पिकअप वाहनासही धडक दिली. या अपघातात विजय पांढरे व सुरेश शेंडगे हे दोघे जखमी झाले असुन वाहनांचे नुकसान झाले आहे. अशा मजकुराच्या विजय पांढरे यांनी दि. 05 जून रोजी दिलेल्या प्रथम खबरेवरुन भा.दं.सं. कलम- 279, 337, 338 अंतर्गत गुन्हा नोंदवला आहे.

From around the web