उस्मानाबाद जिल्ह्यात तीन अपघातात तीन जखमी 

 
Osmanabad police

परंडा : पांडुरंग सतीश भोसले, रा.भांडगाव  हे दिनांक  04 जुलै रोजी 07.20 वा मोटारसायकल क्रमांक एम एच 12 टी एफ 5690 वरुन जात असतांना कार  क्रमांक एच एच 14 एफ जी 2972  च्या  अज्ञात चालकाने  हयगईने व निष्काळजीपणे वाहन चालवुन पांडुरंग  यांच्या मोटारसायकलला  समोरुन  जोराची धडक देवुन गंभीर जखमी केले. अशा मजकुराच्या दिनांक 10 जुलै रोजी पांडुरंग भोसले यांनी  दिलेल्या प्रथम खबरेवरुन भा.दं.सं. कलम- 279, 337, 338, 427 सह मोवाका 184 अंतर्गत गुन्हा नोंदवला आहे.

 वाशी : अजय बापुसाहेब गायकवाड, रा.सरमकुडी बोलेरो वाहन क्रमांक एच एच 12 एफ एफ 7539 च्या चालकाने त्याचे ताब्यातील वाहन हे भरधाव वेगात, हयगईने व निष्काळजीपणे  चालवुन चंद्रकांत श्रीरंग गायकवाड, रा. सरमकुडी यांना  गंभीर जखमी केले  अशा मजकुराच्या दत्तात्रय पांडुरंग  पडवळ, रा.उपळा (मा) यांनी  दिलेल्या प्रथम खबरेवरुन भा.दं.सं. कलम- 279, 337, 338 सह मोवाका 184 अंतर्गत गुन्हा नोंदवला आहे.

नळदुर्ग : श्रीनिवास राठोड, रा.जळकोट हे दिनांक 05 जुलै रोजी 13.00 वा जळकोट शिवारातुन मोटारसायकल क्रमांक एम एच 25 ए एफ 4235 चालवत जात होते.यावेळी पाठीमागुन आलेल्या पीकअप वाहन क्र.एम एच 25 ए जे 3432 च्या धडकेने ते गंभीर जखमी झाले.अपघाता नंतर पिकअपचा  अज्ञात चालक वाहनासह पसार झाला.अशा मजकुराच्या श्रीनिवास राठोड यांनी  दिलेल्या प्रथम खबरेवरुन भा.दं.सं. कलम- 279, 337, 338 सह मोवाका 184 अंतर्गत गुन्हा नोंदवला आहे.

From around the web