उस्मानाबाद जिल्ह्यात १८ मार्च रोजी हाणामारीच्या तीन घटना 

 
उस्मानाबाद जिल्ह्यात १८ मार्च रोजी हाणामारीच्या तीन घटना

 येरमाळा: सुनिल भागवत काळे, रा. लक्ष्मी पारधी पिढी, तेरखेडा, ता. वाशी यांनी पुर्वीच्या वादावरुन 17 मार्च रोजी 15.00 वा. सु. लक्ष्मी पारधी पिढी येथे गावकरी- भागवत साहेबा काळे यांना डोक्यात दगड मारुन जखमी केले. यावेळी भागवत काळे यांच्या बचावास आलेल्या त्यांच्या मुलासही दगडाने मारहाण करुन जखमी केले. अशा मजकुराच्या भागवत काळे यांनी दिलेल्या प्रथम खबरेवरुन भा.दं.सं. कलम- 324 अंतर्गत गुन्हा नोंदवला आहे.

 
 उस्मानाबाद (श.): तांबरी विभाग, उस्मानाबाद येथील दिनेश वसंत पवार, वसंत शंकर पवार, प्रकाश शंकर पवार, जमुना शंकर पवार या चौघांनी भुखंडाच्या जुन्या वादावरुन 16 मार्च रोजी 19.00 वा. सु. भोसले हायस्कुल, उस्मानाबाद समोर गल्लीतील- विवेक चंद्रकांत काळे यांना शिवीगाळ करुन लाथाबुक्क्यांनी, काठीने मारहाण करुन जखमी केले व ठार मारण्याची धमकी दिली. अशा मजकुराच्या विवेक काळे यांनी 17 मार्च रोजी दिलेल्या प्रथम खबरेवरुन भा.दं.सं. कलम- 324, 323, 504, 506, 34 अंतर्गत गुन्हा नोंदवला आहे.

शिराढोन: ताडगाव, ता. कळंब येथील बाळासाहेब, बापुराव, कुसवर्ता, शोभा, परीमला, मुक्ताबाई या जाधवर कुटूंबीयांनी 16 मार्च रोजी 18.30 वा. सु. नातेवाईक- शितल गोविंद जाधवर यांच्या राहत्या घरात घुसून राहत असलेल्या जागेच्या कारणावरुन शितल जाधवर यांना शिवीगाळ करुन लाथाबुक्क्यांनी, दगडाने मारहाण करुन जखमी केले. तसेच घरासमोरील कोंबड्यासाठी केलेले कुंपन मोडून वाहनावर दगड मारुन नुकसान केले. अशा मजकुराच्या  शितल जाधवर यांनी 17 मार्च रोजी दिलेल्या प्रथम खबरेवरुन भा.दं.सं. कलम- 141, 143, 147, 149, 452, 324, 323, 427, 504, 506 अंतर्गत गुन्हा नोंदवला आहे.


“चोरी.”

उमरगा: पळसगांव, ता. उमरगा येथील सुरेश लक्ष्मण चव्हाण हे 16 मार्च रोजी 09.30 वा. सु. उमरगा बसस्थानकाकडे पायी जात असतांना शहरातील गणेश उडपी हॉटेलसमोर आले असता त्यांच्या विजारीच्या पाठीमागी खिशातील स्मार्टफोन अज्ञाताने गर्दीचा फायदा घेउन चारुन नेला. अशा मजकुराच्या सुरेश चव्हाण यांनी 17 मार्च रोजी दिलेल्या प्रथम खबरेवरुन भा.दं.सं. कलम- 379 अंतर्गत गुन्हा नोंदवला आहे.

“अपघात.”

उमरगा: चालक- उमर फारुक महम्मदअली फुलारी, रा. कार्ले प्लॉट, उमरगा यांनी 15 मार्च रोजी 19.30 वा. सु. गुंजोटी- उमरगा रस्त्यावर मोटारसायकल क्र. एम.एच. 25 एपी 3990 ही चुकीच्या दिशेने निष्काळजीपणे चालवून पायी जाणाऱ्या संजय सखाराम बडोदकर, रा. सोलापूर यांना समोरुन धडक दिली. या अपघातात बडोदकर यांच्या उजव्या पायाचे हाड मोडले आहे. या अपघातानंतर नमूद मो.सा. चालक जखमीस उपचाराची तजबीज न करता अपघाताची खबर नजीकच्या पोलीस ठाण्यास न देता अपघातस्थळावरुन पसार झाला. अशा मजकुराच्या संजय बडोदकर यांनी 17 मार्च रोजी दिलेल्या प्रथम खबरेवरुन भा.दं.सं. कलम- 279, 337, 338 सह मो.वा.का. कलम- 184, 134 (अ) (ब) अंतर्गत गुन्हा नोंदवला आहे.

                                                                                   

From around the web