उस्मानाबाद जिल्ह्यात हाणामारीच्या तीन घटना 

 
उस्मानाबाद जिल्ह्यात हाणामारीच्या तीन घटना

आंबी: इनगोंदा, ता. परंडा येथील सुभाष व श्रेयश सुभाष जगताप या दोघा पिता- पुत्रांनी शेतबांध व शेतरस्त्यावरुन 19 एप्रील रोजी 17.30 वा. सु. इनगोंदा शेत शिवारात भाऊबंद- वसंत व माणिक वसंत जगताप या दोघ पिता- पुत्रांना शिवीगाळ करुन लाथाबुक्क्यांनी, दगड, काठीने मारहाण करुन जखमी केले. तसेच ठार मारण्याची धमकी दिली. अशा मजकुराच्या माणिक जगताप यांनी 25 एप्रील रोजी दिलेल्या प्रथम खबरेवरुन भा.दं.सं. कलम- 324, 504, 506, 34 अंतर्गत गुन्हा नोंदवला आहे

उमरगा: मुळज, ता. उमरगा येथील किसन पांडुरंग वडदरे यांच्या कोंबड्या 24 एप्रील रोजी 17.00 वा. सु. भाऊ- शिवाजी वडदरे यांच्या शेतातील हरभरा पिकात चरत होत्या. यावर शिवाजी वडदरे यांनी भाऊ- किसन यांना त्याचा जाब विचारला असता किसन यांसह अर्जुन वडदरे, लक्ष्मीबाई वडदरे, पुजा वडदरे अशा चौघांनी संगणमताने शिवाजी वडदरे यांना शिवीगाळ करुन ठार मारण्याची धमकी दिली व लाथाबुक्क्यांनी, कुऱ्हाडीच्या तुंब्याने, दगडाने मारहाण करुन जखमी केले. अशा मजकुराच्या शिवाजी वडदरे यांनी 25 एप्रील रोजी दिलेल्या प्रथम खबरेवरुन भा.दं.सं. कलम- 325, 323, 504, 506, 34 अंतर्गत गुन्हा नोंदवला आहे.


 कळंब: शेतरस्त्याच्या रहदारीच्या कारणावरुन हासेगाव, ता. कळंब येथील मंडळ कुटूंबातील ओम, हरी, ज्ञानेश्वर, गोविंद अशी चौघे 25 एप्रील रोजी 17.00 वा. सु. हासेगाव शेत शिवारात गावकरी- शिवशंकर खरडकर यांच्या सोबतद वाद करत होते. यावेळी शिवशंकर यांची पत्नी- सत्यभामा यांनी तेथे येउन पतीसोबत वाद करण्याचा जाब विचारला असता नमूद चौघांनी सत्यभामा यांना शिवीगाळ करुन दगडाने मारहाण करुन जखमी केले. अशा मजकुराच्या सत्यभामा खरडकर यांनी दिलेल्या प्रथम खबरेवरुन भा.दं.सं. कलम- 324, 337, 323, 504, 34 अंतर्गत गुन्हा नोंदवला आहे.
 

From around the web