उस्मानाबाद जिल्ह्यात चोरीच्या तीन घटना 

 
उस्मानाबाद जिल्ह्यात चोरीच्या तीन घटना

तुळजापूर: विजयालक्ष्मी संजय क्षिरसागर, रा. आरळी (बु.), ता. तुळजापूर यांच्या राहत्या घराचे कुलूप अज्ञात व्यक्तीने 21- 22 रोजी दरम्यान तोडून घरातील एलईडी टीव्ही, ओव्हन, साड्या व रोख रक्कम असा एकुण 60,000 ₹ चा माल चोरुन नेला. अशा मजकुराच्या विजयालक्ष्मी क्षिरसागर यांनी 23 एप्रील रोजी दिलेल्या प्रथम खबरेवरुन भा.दं.सं. कलम- 457, 380 अंतर्गत गुन्हा नोंदवला आहे.

 उस्मानाबाद  : उस्मानाबाद तालुक्यातील गावसुद शिवारातील गट क्र. 155, 156, 158 मधील विद्युत खांबावरील एएल 56/ 261 स्क्वेअर एमएम कंडक्टर (ॲल्युमिनीअम वायर), सस्पेन्शन हार्डवेअर, केव्ही पिन इन्शुलेटर- 70 नग, केव्ही डिक्स इन्शुलेटर- 28 नग असा माल अज्ञाताने 13- 14 एप्रील रोजी दरम्यान चोरुन नेला. अशा मजकुराच्या अक्षय अनिल मुळे, रा. उक्कडगांव, ता. बार्शी यांनी 23 एप्रील रोजी दिलेल्या प्रथम खबरेवरुन भा.दं.सं. कलम- 379 अंतर्गत गुन्हा नोंदवला आहे.

उस्मानाबाद  : सौरभ श्रीराम घोडके, रा. समता कॉलनी, उस्मानाबाद यांच्या शहरातील आडतलाईन येथील गुदामाचा वरील बाजूचा पत्रा अज्ञात व्यक्तीने 22- 23 एप्रील दरम्यानच्या रात्री उचकटून गुदामातील हरभऱ्याचे 17 पोते व गव्हाचे 2 पोते चोरुन नेले. अशा मजकुराच्या सौरभ घोडके यांनी दिलेल्या प्रथम खबरेवरुन भा.दं.सं. कलम- 461, 380 अंतर्गत गुन्हा नोंदवला आहे.

अपघात

 उमरगा: चालक- युसूफ महेताब पटेल, रा. दाबका, ता. उमरगा  यांनी 21 एप्रील रोजी 19.30 वा. सु. जकेकुर येथील राष्ट्रीय महामार्ग क्र. 65 वर प्याजीओ ऑटोरिक्षा क्र. एम.एच. 25 एन 1114 हा निष्काळजीपणे चालवून रस्ता ओलांडणारे जकेकुरवासी- राजेंद्र विश्वनाथ जाधव, वय 40 वर्षे यांना धडक दिल्याने ते गंभीर जखमी होउन मयत झाले. या अपघातात ऑटोरिक्षा पलटल्याने आतील प्रवासी- मल्लवा लक्ष्मण दरेकर, वय 49 वर्षे, रा. उमरगा या गंभीर जखमी हाउन मयत झाल्या तर पदमाबाई चव्हाण व रेणुका देवकर, रा. उमरगा या दोघी किरकोळ जखमी झाल्या. अशा मजकुराच्या राजेंद्र जाधव (मयत) यांच्या भाऊ परमेश्वर विश्वनाथ जाधव यांनी 23 एप्रील रोजी दिलेल्या प्रथम खबरेवरुन भा.दं.सं. कलम- 279, 304 (अ

From around the web