मारहाण प्रकरणी तिघांना आर्थिक दंडाच्या शिक्षा

 
Osmanabad police

उस्मानाबाद -  गावसुद, ता. उस्मानाबाद येथील युवराज संभाजी घायाळ यांसह त्यांची पत्नी- सुरेखा, मुलगा- नितीन यांनी मारहान केल्यावरुन उस्मानाबाद (ग्रा.) पो.ठा. येथे गु.र.क्र. 209 / 2017 हा नोंदवण्यात आला होता. या खटल्याचा निकाल आज दि. 25.05.2021 रोजी प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी, उस्मानाबाद मा. श्री. कलाल यांच्या न्यायालयात जाहिर झाला. यात न्यायालयाने नमूद तीघांना भा.दं.सं. कलम- 34, 323 च्या उल्लंघनाबद्दल दोषी ठरवून प्रत्येकी 500 ₹ दंडाची व न्यायालयाचे कामकाज संपेपर्यंत कारावासाची शिक्षा तसेच दंड न भरल्यास 3 दिवस साध्या कारावासाची शिक्षा सुनावली आहे.

दोन ठिकाणी हाणामारी 

परंडा: दहिटणा, ता. परंडा येथील ग्रामस्थ- योगेश दादा शिंदे व जनार्दन शिंदे यांच्या गटाचा आपसात जुना वाद असुन तो वाद दि. 24 मे रोजी 00.15 वा. सु. उफाळून आला. यात जनार्दन शिंदे, सागर शिंदे, अविनाश शिंदे यांसह अविनाश याचे पुणे येथील तीन अज्ञात मित्र अशा सहा जणांनी योगेश शिंदे यांसह त्यांचे पिता- दादा, आई- सुनिता, भाऊ- नागेश यांना शिवीगाळ करुन लाथाबुक्क्यांनी, काठीने मारहान केली. यावेळी सागर शिंदे याने नागेश यांच्या डोक्यात कोयता मारल्याने ते गंभीर जखमी झाले. अशा मजकुराच्या योगेश शिंदे यांनी बार्शी येथील रुग्णालयात वैद्यकीय उपचारादरम्यान दिलेल्या लेखी निवेदनावरुन नमूद सहा जणांविरुध्द भा.दं.सं. कलम- 143, 147, 148, 149, 323, 324, 326, 504 अंतर्गत गुन्हा नोंदवला आहे.

 वाशी: मछींद्र येडबा सुकाळे, वय 65 वर्षे, रा. पिंपळगाव (लिंगी), ता. वाशी हे दि. 24 मे रोजी 12.00 वा. सु. गाव शिवारातील गट क्र. 46 मधील शेतात जनावरांना पाणी पाजत होते. यावेळी भाऊबंद-गणेश व भाग्यश्री सुकाळे या पती- पत्नींनी तेथे येउन, “तुझ्याकडे जास्त आलेले आमचे शेत आम्हाला सोडून दे.” असे मछींद्र यांना  धमकावून शिवीगाळ करुन ठार मारण्याची धमकी दिेली. यावेळी गणेश याने कुऱ्हाडीने मछींद्र यांच्या उजव्या घोट्यावर घाव घातला तर भाग्यश्री यांनी डोक्यात दगड मारुन जखमी केले. अशा मजकुराच्या मछींद्र सुकाळे यांनी दि. 24 मे रोजी दिलेल्या प्रथम खबरेवरुन भा.दं.सं. कलम- 323, 324, 326, 504, 506, 34 अंतर्गत गुन्हा नोंदवला आहे.

From around the web