तीन गुन्ह्यातील तीन आरोपींना आर्थिक दंडाची शिक्षा

 
तीन गुन्ह्यातील तीन आरोपींना आर्थिक दंडाची शिक्षा

तुळजापुर: रहदारीस, मानवी जिवीतास धोका होईल अशा निष्काळजीपणे रस्त्यात वाहने उभी करुन भा.दं.सं. कलम-  283 चे उल्लंघन केल्याबददल सचिन अंबादास केचे, रा. तुळजापुर व समाधान झुंबर कांबळे, रा. जवळगा, या दोघांना प्रत्येकी  200 ₹ दंडाची व दंड न भरल्यास 4 दिवस साध्या कारावासाची  शिक्षा प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी, तुळजापुर यांनी आज 9 एप्रील रोजी सुनावली आहे.

पोलीस ठाणे, शिराढोण: जुगार चालवुन महाराष्ट जुगार प्रतिबंधक कायदा कलम 12 (अ) चे उल्लंघन केल्याबददल शेरखान गुलाब शेख, रा. नागुलगाव, यांना 300 ₹ दंडाची शिक्षा प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी, कळंब यांनी आज 9 एप्रील रोजी सुनावली आहे.

कायदा, मनाई आदेशांचे उल्लंघन करणाऱ्यांवर 4 गुन्हे दाखल

 बेंबळी : चालक – बशीर तांबोळी रा. पाडोळी (आ) ता. उस्मानाबाद व विरपाशा शेख, रा. कनगरा यांनी 07 एप्रील रोजी 16.50 वा. घुगी गावात आपआपली टाटा-एस ही वाहने निष्काळजीपणे भरधाव वेगात चालवुन भा.दं.सं. कलम- 279 उल्लंघन केले.

 नळदुर्ग: चालक– शहबाज पिंजारी रा.नळदुर्ग यांनी 08 एप्रील रोजी 10.30 वा. नळदुर्ग बसस्थानका समोरील महामार्गावर आपला ॲटो रीक्षा रहदारीस व  मानवी जिवीतास  धोका होईल अशा पध्दतीने उभा  करुन  भा.दं.सं. कलम- 283 उल्लंघन केले.

 उस्मानाबाद ग्रामीण : रत्नदिप बोराडे रा. चिलवडी  यांनी प्रशासनाचे मनाई आदेश झुगारुन 08 एप्रील रोजी 18.00 वा. चिलवडी गावातील बस थांब्याजवळील चहा हॉटेल व्यवसायास चालु ठेवुन भा.दं.सं. कलम- 188, 269 चे उल्लंघन केले.

From around the web