तीन गुन्ह्यातील तीन आरोपींना आर्थिक दंडाची शिक्षा

 

उस्मानाबाद -  उस्मानाबाद (ग्रा) नामदेव हाके यांनी 4 एप्रील रोजी  12.15 वा. येडशी टोल नाका परिसरातील खानावळीत मानवी जिवीतास धोका होईल अशा निष्काळजीपणे अग्नी प्रज्वलीत करुन भा.दं.सं. कलम-  285 चे उल्लंघन केल्याने त्यांना 200 ₹ दंडाची शिक्षा तर सिगारेट व तंबाखुजन्य पदार्थ प्रतिबंधक कायदयाचे उल्लंघन करणा-या सागर अजिनाथ जाधव यांना 200 ₹ दंडाची शिक्षा प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी, उस्मानाबाद यांनी आज 5 एप्रील रोजी सुनावली आहे.

 
 परंडा: रहदारीस धोका व अडथळा  होईल अशा प्रकारे रस्‍त्यात वाहन उभे करुन भा.दं.सं. कलम- 283 चे उल्लंघन केल्याबददल  रामेश्वर बेलगावकर यांना  200 ₹ दंडाची शिक्षा प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी, उस्मानाबाद यांनी आज 3 एप्रील रोजी सुनावली आहे.

निष्काळजीपणे वाहन चालवणा-या 2 चालकांवर 2 गुन्हे दाखल

 तामलवाडी : चालक भैरु गुंड यांनी  04 एप्रील रोजी 1800 वा . सुरत गाव येथे टॅ्क्‍टर क्र एम.एच.25 ए.एल.8676 हा मानवी जीवीत धोक्यात येईल अशा प्रकारे निष्काळजीपणे भरधाव वेगात चालविला. अशा मजकुराच्या गावकरी चिमाबाई सुरते यांनी दिलेल्या प्रथम खबरेवरुन भा.दं.सं. कलम-279 अंतर्गत गुन्हा नोंदवला आहे.

उस्मानाबाद  : चालक मधुकर कोळी रा. येडशी हे   04 एप्रील रोजी 1500 वा . येडशी टोल नाका  परिसरात महामार्गावर  रिक्षा  क्र एम.एच.25 एन. 0520 ही मानवी जीवीत धोक्यात येईल अशा प्रकारे निष्काळजीपणे भरधाव वेगात चालवताना उस्मानाबाद (ग्रा)पो.ठा. च्या पथकास आढळले. यावरुन पोलीसांनी सरकार तर्फे दिलेल्या प्रथम खबरेवरुन  भा.दं.सं. कलम-279 अंतर्गत गुन्हा नोंदवला आहे.

From around the web