तीन आरोपीस आर्थिक दंडाची शिक्षा

 
Osmanabad police

उस्मानाबाद  -  कोविड-19 च्या पार्श्वभुमीवर जारी मनाई आदेशांचे उल्लंघन करुन कोव्हीड संसर्गाची शक्यता निर्माण करुन भादसं कलम 269 चे उल्लंघन करणा-या  संतोष बाळासाहेब लोमटे, रा.काजळा यांना आज दिनांक 10 जुलै  रोजी 1,000 रुपये  आर्थीक  दंडाची  शिक्षा प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी उस्मानाबाद यांनी सुनावली आहे.

उस्मानाबाद  -  सार्वजनिक ठिकाणी धोकादायकपणे अग्नी  प्रज्वलीत करुन मानवी जिवीतास धोका निर्माण करुन   भादसं कलम 285  चे उल्लंघन केल्याबददल  संतोष राउत व अझर शेख या दोघांना प्रत्येकी 200 रु दंडाची शिक्षा आज दिनांक 10 जुलै  रोजी  प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी उस्मानाबाद यांनी सुनावली आहे.


 कोवीड मनाई आदेशांचे उल्लंघन प्रकरणी दोन गुन्हे दाखल

ढोकी : कोविड- 19 संबंधी शासनाने जारी केलेल्या मनाई आदेशांचे उल्लंघन  करुन धनराज डोलारे यांनी लातुर रस्त्यावरील शांताई हॉटेल तर बालाजी सुरवसे, राहुल लंगडे, सहदेव करंजकर, रंगनाथ काकडे , विश्वास पवार यांनी लातुर रस्त्यावरील आपले हॉटेल दिनांक 09 जुलै रोजी 17.15 वा  व्यवसायास चालु ठेवले असल्याचे ढोकी पोलीसांना आढळले. यावरुन भादसं कलम 188, 269 अंतर्गत दोन गुन्हे नोंदविण्यात आले आहेत.

 
सार्वजनिक ठिकाणी रहदारीस धोका निर्माण करणाऱ्या चार व्यक्तींवर गुन्हे दाखल

 
उमरगा :  महेश दादाराव  गायकवाड, रा.तुरोरी ,  युसुफ वजीरासाब शेख , रा. रामनगर, उमरगा, विठठल हत्ती काळे, रा.गुंजोटी , चंद्रकांत कांबळे ,रा.बसवकल्याण  यांनी आपापली   वाहने उमरगा शहरात वेगवेगळया ठिकाणी रहदारीस धोका अडथळा निर्माण होईल अशा रितीने उभी करुन भादसं कलम 283 चे उल्लंघन केले असल्याचे दि.09.07.201 रोजी  उमरगा पोलीसांना आढळले . यावरुन भादसं कलम 283 अंतर्गत  चार गुन्हे नोदंविण्यात आले आहेत.

From around the web