अवैध गुटखा प्रकरणी जिल्ह्यात तीन गुन्हे दाखल

 
s

उस्मानाबाद  - महाराष्ट्र शासन प्रतिबंधीत गुटख्याची विक्री होत असल्याची गोपनीय खबर स्था.गु.शा. च्या पोनि गजानन घाडगे यांच्या पथकास मिळाली होती. यावर स्था.गु.शा. च्या पोउपनि- भुजबळ, माने, पोहेकॉ- साळुंके, हुसेन सय्यद, ठाकुर, पोकॉ- जाधवर, आरसेवाड, होळकर यांच्या पथकाने दि. 25 जून रोजी दोन ठिकाणी छापे टाकले होते. 

माकणी, ता. लोहारा येथे विठ्ठल विश्वंभर मुसांडे हे 55,500 ₹ किंमतीचा तर मिल्ली कॉलनी, उस्मानाबाद येथे सलीम गफुरसाब तांबोळी हे 26,360 ₹ किंमतीचा गुटखा, सुगंधी सुपारी असा महाराष्ट्र शासन प्रतिबंधीत अन्न पदार्थ  अवैध विक्री व्यवसायास बाळगलेले आढळले होते. यावर पथकाने नमूद प्रतिबंधीत माल जप्त करुन अन्न व औषध प्रशासनास माहिती दिली होती. 

याप्रकरणी अन्न व औषध प्रशासनाच्या अन्न सुरक्षा अधिकारी श्रीमती रेणुका पाटील व प्रमोदकुमार काकडे यांनी दिलेल्या दोन प्रथम खबरे वरुन भादसं 188, 272,273,328 सह  वाचन अधिनियमाअंतर्गत दोन गुन्हे लोहारा व आनंदगर पोलीस ठाण्यात नोंदविण्यात आले आहेत.

 जळकोटमध्ये छापा 

नळदुर्ग: गोपनीय खबरे आधारे नळदुर्ग पोलीसांनी दि 29 जुन रोजी 14.00 वा जळकोट गावात छापा टाकला असता संजय हुलसुरे व लक्ष्मण चव्हाण हे महाराष्ट्र शासन प्रतिबंधीत अंदाजे 8500 रु किंमतीचा  गुटखा अवैध विक्री व्यवसायास बाळगलेले आढळले. यावरुन पोलीसांनी दिलेल्या प्रथम खबरे वरुन भादसं 188, 272,273,328 सह  वाचन अधिनियमाअंतर्गत गुन्हा नोंदविण्यात आला आहे.

From around the web